प्रेम विवाह केलेल्या विवाहितेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नवी मुंबईतील बेलापूर येथे घडली. याप्रकरणी पीडित विवाहितेचा पती, सासू, सासरे यांच्याविरोधात छळवणूक आणि आत्महत्येस कारण म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हरी वाढवे हे आपल्या कुटुंबासह बेलापूर येथील पंचशील नगर येथे राहतात. त्यांनी गावाकडील कपील राऊत याला आसरा देत नौकरीस लाऊन दिले. दरम्यान त्याचे घरी येणे जाणे वाढले आणि त्यात हरी यांची मुलगी अंजली आणि कपील यांची मैत्री आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. याची माहिती मिळताच कुठलीही आडकाठी न घेता दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने ३ जून २०२२ मध्ये साखरपुडा आणि ५ जूनला लग्न लाऊन दिले. मुलगी सुखात राहावी म्हणून कपिल याच्या वडिलांनी मागणी केल्याप्रमाणे ५ लाख रुपये लग्नासाठी दिले.
लग्न बौद्ध विहार भीमनगर कळमनुरी जिल्हा हिंगोली या मूळ गावी पार पडले. त्यातही अचानक केलेली ५० हजार रुपयांची मागणीही उसनवारी करून पूर्ण करण्यात आली. मात्र, लग्न झाल्यावर २० दिवसांनी मुलगी माहेरी आल्यावर सासरचे चांगले नसून पूर्ण पैसे दिले नाही म्हणून टोमणे मारतात ही तक्रार आली. कालांतराने हा त्रास वाढला. सासर माहेरजवळ असल्याने अंजलीचे माहेरी येणे जाणे होत होते, त्यामुळेही घरात वाद होत होते. दरम्यान हळू हळू ठीक होईल म्हणून समजूत काढली जात होती. मात्र, डिसेंबरमध्ये अंजली माहेरी आली ती कायमचीच. तिच्याकडील दागिने काढून घेत हाकलून दिल्याची माहितीही अंजली हिने दिली. तेव्हापासून ती माहेरीच राहत होती.
३० जानेवारीला नेहमीचे काम संपवून हरी हे घरी आले त्यावेळी घराला आतून कडी होती, मात्र अनेकदा हाक मारून दार न उघडल्याने त्यांनी शेजाऱ्याकडून हातोडी घेत दरवाजा तोडला व आत प्रवेश केला असता अंजलीने फाशी घेत आत्महत्या केल्याचे दृश्य दिसले. तिला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याबाबत ५ जून २०२२ ते १ डिसेंबर २०२२ दरम्यान हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने मुलीचा जाच करून शिवीगाळ करीत शारीरिक मानसिक त्रास दिल्याने मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार केली आहे. एनआरआय पोलीस ठाण्यात पती कपील राऊत सासू सिंधुताई आणि सासरा प्रल्हाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.