पनवेल महानगरपालिकेबाबत सरकारने अधिसूचना काढल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पनवेलकडे लक्ष केंद्रित केले आहे. शेकापच्या मदतीने महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचा तटकरे यांचा मनसुबा आहे. दोन वर्षांपासून कार्यकर्त्यांच्या दृष्टीस न पडलेले तटकरे एकाच दिवसात उरण व पनवेल या दोनही तालुक्यांमध्ये जाहीर सभा घेऊन राष्ट्रवादीची हवा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. दसऱ्यापर्यंत पक्षातील सर्व पदाधिकारी नेमा, असे आदेश त्यांनी एका सभेत दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तटकरे यांनी आपल्या निकटवर्तीयांना २४ दिवसात समितींवर पदाधिकारी नेमण्याच्या सूचना केल्याने सध्या या पक्षात पदाधिकाऱ्यांची वर्णी लावण्यासाठी शोधाशोध सुरू झाली आहे. तटकरे यांच्यापेक्षाही व्यस्त या पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल हे असल्याने त्यांचाही पनवेल तालुक्यातील पक्षबांधणीकडे कल नसल्याने जिल्हास्तरीय आदेशावरून तालुकास्तरीय बैठका लावून पक्षबांधणीचा आढावा घेतला जात नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस व शेकापक्ष हे दोनही राजकीय पक्ष शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकत्र आल्यामुळे सध्या तटकरे हे शेकापच्या कार्यक्रमातील व्यासपीठावर दिसतात. २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पनवेल मतदारसंघात एकटी लढली, त्यावेळी भारतीय जनता पक्ष व शेकाप या दोनही पक्षांच्या मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रत्येकी १ लाख १० हजारांच्या वर मते मिळाली, त्याचवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला २७३२ मते मिळाल्याने पनवेलमध्ये नेमकी राष्ट्रवादीची ताकद किती असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.याच पक्षातून भीमसेन माळी व इतर कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात जाण्याची वेळ आली आहे.राज्यात आघाडीची सत्ता असताना सिडको मंडळावरील दोनही महत्त्वाची पदे ही राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आली होती. त्यावेळी माजी मंत्री सुनील तटकरे यांनी पुढाकार घेऊन मराठा कार्डला प्राधान्य देत सिडको मंडळाचे अध्यक्षपद प्रमोद हिंदुराव तसेच   वसंत भोईर हे यांना संचालकपद दिले.