उरण : एका महिलेच्या तक्रारीवरून उरण पोलिसांनी चिटफंड प्रकरणाच्या सुत्रधाराला अटक केली होती. या आरोपीला सोडा, तो देव माणूस आहे, गरिबांचा आधार आहे, त्याने कोणाला फसवले नाही. उलट अनेकांना मदत केली. अशी मते व्यक्त करीत या उरणच्या रॉबिनहूडच्या समर्थनार्थ उरणच्या न्यायालय परिसरात शेकडो जण जमा झाले होते. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी की रॉबिनहूड? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुंतवणुकीवर ४० टक्के परतावा देणाऱ्या सतीश गावंडला उरण पोलिसांनी चिटफंड प्रकरणात अटक केली आहे. त्याला बुधवारी उरण न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्याचे समर्थक असलेल्या उरणमधील हजारो नागरीकांनी न्यायालय परिसरातील रस्त्यांवर प्रचंड गर्दी केली होती. न्यायालयाने त्याला पुन्हा पोलीस कोठडी दिली आहे. तर त्याच्या दोन साथीदारांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. उरणसह अनेक भागांतील लोकांनी या ४० टक्के परताव्याच्या योजनेत पैसे गुंतवले आहेत. यातील अनेकांना या योजनेचा लाभ झाला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या भरघोस गुंतवणुकीच्या योजनेबाबत आकर्षण वाढल आहे. मात्र पोलिसांनी या योजनेच्या प्रमुख सुत्रधाराला अटक केले आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराकडून आपल्याला पैसे मिळतील का याबाबत शंका – कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे अनेकांचे या प्रकरणाकडे लक्ष लागून राहिले आहे. १८ फेब्रुवारीपासून या संदर्भातच उरण तालुक्यातील गावांत व नाक्यांवर चर्चा सुरू आहे. तर आजच्या तुफानगर्दीची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – यंदा ज्वारीचे उत्पादन कमी, आगामी काळात दरवाढ होणार? यावर्षी उत्पादनात ३० ते ४० टक्के घट

हेही वाचा – नवी मुंबई : महापालिका आयुक्त नार्वेकर यांनी सहाय्यक आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या

अनेकांसाठी रॉबिनहूडच

या संदर्भात काही समर्थकांनी दिलेल्या माहितीनुसार गावंड यांनी अनेकांना आजारासाठी, लग्नासाठी, व्यवसायासाठी, अडल्या-नडलेल्याना सढळ हस्ते मदत केली. त्यामुळे त्याला आमचा पाठींबा आहे. त्याच्या सुटकेसाठी आम्ही काहीही करू, असाही विश्वास अनेकजण व्यक्त करीत होते. खासकरून गावंड याच्या पिरकोन गावातील अनेकजण यावेळी त्याच्या समर्थनार्थ उपस्थित होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supporters came in court supporting mastermind of uran chit fund case ssb