उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी नवी मुंबईमधील ‘महाप्रबोधन यात्रे’दरम्यान झालेल्या कार्यक्रमामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली. आपल्या भाषणांमुळे मागील काही काळामध्ये लोकप्रिय झालेल्या अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या चिठ्ठीच्या प्रकरणावरुन चांगलीच शाब्दिक फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं.

नक्की वाचा >> “आमचे चुलत भाऊ राज दादा एवढ्या सगळ्या मिमिक्र्या…”; थेट राज ठाकरेंचा उल्लेख करत सुषमा अंधारेंचा शिंदे सरकारला टोला

सुषमा अंधारे यांनी, “काय काय बोलतील पत्ताच लागत नाही. आम्ही आमच्या आयुष्यात असं कधी पाहिलं नाही. काय काय पाहायला मिळतंय आम्हाला आज. माझा भाऊ मुख्यमंत्री आहे. मला वाईट वाटतं आहो. मला नाही चालत माझ्या भावाचा असा अपमान केलेलं. वाईट वाटतं मला. माझ्या भावाच्या समोरचा माईक ते काढून घेतात,” असं आपल्या भाषणात म्हटलं. त्यांचं हे विधान ऐकून सभागृहामध्ये उपस्थित असणारे सारेच हसू लागले. “बोलायला लागले की कागद देतात. का माझ्या भावाला येत नाही काही? माझा भाऊ ढ वाटतो का तुम्हाला? माझा भाऊ कॉप्या करुन पास झालाय का?” असा उपहासात्मक प्रश्न अंधारे यांनी विचारला.

Abhijeet Guru
“लेखकांना मान कमी…”, अभिजीत गुरूने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Reshma Shinde
‘रंग माझा वेगळा’मध्ये सावळ्या मुलीला का घेतलं नाही? ‘अशी’ झालेली रेश्मा शिंदेची निवड; मालिकेच्या लेखकानं सांगितलं कारण
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Vikrant Massey family religion variety
“माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबद्दल खुलासा
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!

नक्की वाचा >> ‘भाजपाची ढाल अन् गद्दारांची तलवार’ टीकेवरुन फडणवीस संतापले; ठाकरे गटाला लक्ष्य करत म्हणाले, “याहून मोठी गद्दारीच…”

गिरीश महाजनांचा उल्लेख…
“हुशार आहे माझा भाऊ. विद्वान आहे माझा भाऊ. का कागद देताय तुम्ही त्यांना? का कॉप्या पुरवताय?” असा प्रश्न अंधारे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला आणि पर्यायाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाकेला. “गिरीश महाजनांनी कागद धरुन सांगायचं. हे अजिबात बरोबर नाही अध्यक्ष महोदय
हे आम्हाला पटलेलं नाही,” असं म्हणत अंधारे यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली.

नक्की वाचा >> दीड वर्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबाला लागलेली शिंदेंच्या बंडाची चाहूल? आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आमच्या घरात…”

माईक खेचण्याचा प्रकार नेमका काय?
हिंगोलीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे बहुमत चाचणीच्या दिवशी म्हणजेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात बंडखोर शिंदे गटामध्ये सहभागी झाले. यासंदर्भात पत्रकार परिषदेमध्ये शिंदे यांना बांगर कोणत्या पक्षातून कोणत्या पक्षात आले असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. हा प्रश्न शिंदे यांना पटकन समजला नाही. ते थोडे गोंधळतच, “कुठल्या पक्षातून आले म्हणजे…” असं म्हणत असतानाच बाजूच्या खुर्चीवर बसलेल्या फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसमोरचा माईक खेचून स्वत: समोर घेत, “ते खऱ्या शिवसेनेत आले,” असं उत्तर दिलं आणि हसत पुन्हा माईक शिंदेंसमोर ठेवला. या साऱ्या प्रकरणावरुन सोशल मीडियाबरोबरच विरोधकांनीही फडणवीसांची ही कृती खटकल्याची टीका केली होती.

नक्की वाचा >> Thackeray vs Shinde: रागावू नका पण अडीच वर्ष का लागली? सत्तांतरणासंदर्भातील नाना पाटेकरांच्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, “आम्ही जर…”

चिठ्ठी प्रकरण काय?
या माईक प्रकरणानंतर दोनच आठवड्यांनी झालेल्या अन्य एका पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री शिंदे हे शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भातील निर्णय जाहीर करताना भाजपाचे आमदार दनंजय महाडिकांचं नाव विसरले होते. त्यावेळी फडणवीस यांनी पत्रकार परिषद सुरु असतानाच चिठ्ठी लिहून त्यांना आठवण करुन दिली होती. हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. याच दोन गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आज फडणवीस यांनी पत्रकार परिषद सुरु होण्याआधीच पत्रकारांना आज असं काही होणार नाही असं सूचित केलं.