उरण: करोना नंतर गोवरची साथ पसरली आहे. यामध्ये उरण तालुक्यातील एक संशयित आढळून आला आहे. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले असल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. गोवरच्या साथीमुळे सध्या नागरिकां समोर नवीन संकट आले आहे. ही साथ पसरू नये या करीता आरोग्य विभागाकडून विविध उपायोजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. मात्र सावधानता म्हणून आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. तसेच नागरिकांना गावागावातून आशा वर्कर कडून सूचना व जनजागरण केले जात आहे. उरण मध्ये एक गोवर संशयित आढळला असून त्याची तपासणी केली जात असून तपासणी नंतर त्याच्यावर उपचार केले जाणार असल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांनी दिली आहे. त्याच प्रमाणे गोवर ची लक्षणे असल्यास खाजगी रुग्णालयाने ही रुग्णांची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा