उरण : उरण पनवेल रस्त्याच्या कडेला रविवारी एक कोल्हा मयत झालेला आढळला आहे. कोल्ह्याचा मृत्यू संशयीत असल्याचे बोलले जात आहे. उरण परिसरतातील वन्यजीव धोक्यात आले आहेत. उरण हे सध्या औद्योगिक दृष्ट्या झपाट्याने विकसित होत असलेला तालुका आहे. त्यामुळे येथील जंगल परिसराचा मोठया प्रमाणात विध्वंस केला जात आहे. यामध्ये जंगलांची तोड केली जात आहे. तसेच डोंगर ही पोखरले जात आहेत. त्यामुळे निसर्ग ही नष्ट होऊ लागली आहेत.उरणच्या पश्चिम विभागात खाडी किनाऱ्यावर कांदळवनात कोल्हे आढळले आहेत. काही दिवसांपूर्वी दोन कोल्हे दिसून आले होते. ही कोल्ह्याची प्रजाती लुप्त होऊ लागली आहे. तर काही दिवसांपूर्वी चिरनेर च्या जंगलात मोर आणि डुक्कर यांची शिकार केली जात आहे. त्यामुळे उरण मधील वन्यजीव धोक्यात आले आहेत.
उरण पनवेल मार्गावर कोल्ह्याचा संशयित मृत्यू
उरण पनवेल रस्त्याच्या कडेला रविवारी एक कोल्हा मयत झालेला आढळला आहे. कोल्ह्याचा मृत्यू संशयीत असल्याचे बोलले जात आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 15-01-2023 at 13:01 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspicious death of fox on uran panvel road wildlife animals ysh