नवी मुंबई : स्वराज्य पक्ष २०२४ च्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. शेतकरी आणि कामगारांना केंद्रबिंदू धरून पंचसूत्री प्रमाणे काम करणार अशी घोषणा स्वराज पक्ष संस्थापक संभाजी राजे भोसले यांनी नवी मुंबईतील आपल्या पहिल्या सभेत केली. प्रसंगी समविचारी पक्षाला सोबत ही घेतले जाईल असे सूतोवाच ही संभाजी राजे यांनी केले.
छ. संभाजीराजे भोसले यांनी स्वराज्य पक्षाद्वारे सक्रिय राजकारणात उडी घेतली असून त्यांची पहिली सभा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे रविवारी पार पडली. २०२४ तुमच्या हातात आहे, सुसंस्कृत पुढारी हवे का नको ते तुम्ही ठरवा. तेच धोरण, तेच प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील तर आम्ही कशाला पाहिजे, छत्रपती म्हणून मान घेवून त्याचा उपयोग लोकांसाठी केला नाही तर काय उपयोग त्यापेक्षा घरी बसलेलो बरं मग अशी भावनिक साद त्यांनी घातली.
नवी मुंबई शहरात प्रचाराला स्वतः येणार आहे. मोठ्या सभा नको स्वरूप नकोच शेवटच्या घटकापर्यंत जायचं आहे त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. कोपरखैरणे सेक्टर १५/१८ च्या मैदानावर झालेल्या सभेत खचाखच गर्दी होती त्यात महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती. यावेळी नवी मुंबई कार्यकारणी जाहीर करतो. अंकुश कदम यांना निवडणुकीच्या कामाला लागा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.