नवी मुंबई : वाशी मुंबई कृषी उत्पन्न बाजारात समितीत डिसेंबर-जानेवारीपासून तुरळक प्रमाणात द्राक्षे दाखल होण्यास सुरुवात झाली होती. परंतु ती द्राक्षे चवीला आंबट होती. आता उष्णता वाढायला सुरुवात झाल्याने गोड द्राक्षे बाजारात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे.नोव्हेंबर महिन्यात द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात होते. तसेच जानेवारी मध्ये द्राक्षांचे प्रमाण अधिक वाढते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधारण १५ नोव्हेंम्बर नंतर द्राक्षची आवक सुरू होत असून १५ एप्रिलपर्यत हंगाम सुरू असतो. परंतु यंदा पाऊस लांबल्याने द्राक्षांच्या बागांची छाटणी एक महिना उशिराने सुरू झाली. त्यामुळे यंदा हंगाम सुरू होण्यास विलंब झाला आहे. सुरुवातीला बाजारात आवक तुरळक होती, शिवाय दाखल होणारे द्राक्ष चवीला आंबट होते. त्यामुळे ग्राहक गोड द्राक्षांच्या प्रतीक्षेत होते. परंतु ग्राहकांची प्रतीक्षा संपली असून बाजारात आता गोड द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात झाली आहे.

बाजारात आधी २-३ गाडी दाखल होत असत. आता ९-१० गाड्या दाखल होत असून बुधवारी बाजारात ७०० क्विंटल द्राक्षे दाखल झाली आहेत. सध्या द्राक्षाच्या बागेला पोषक अशा उष्ण वातावरणाची निर्मिती सुरू झाली आहे. या उष्णतेमुळे फळामध्ये गोड रस निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे. घाऊक बाजारात सफेद द्राक्षांच्या ९-१० किलो पेटीला ५०० ते ९०० रुपये बाजारभाव आहे. मार्चमध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात होईल, तसेच १५ एप्रिलपर्यंत द्राक्षांचा हंगाम सुरू राहील असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

सध्या द्राक्षाच्या बागेला पोषक अशा उष्ण वातावरणाची निर्मिती सुरू झाली आहे. या उष्णतेमुळे फळामध्ये गोड रस निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे.

नाशिक, तासगाव, सातारा आणि सांगलीमधून द्राक्षांची आवक होत आहे. बाजारात यापुढे अधिक प्रमाणात गोड द्राक्ष बाजारात दाखल होतील. संजय पिंपळे, घाऊक फळ व्यापारी