पनवेल: तालुक्यातील वलप या गावात सोमवारी रात्री साडेसात वाजता खासगी शिकवणी घेऊन घरी येत असताना शिक्षिकेचा गळा दाबून खून केल्यावर चोरट्यांनी शिक्षिकेच्या अंगावरील सोन्याचे दागीने लुटल्याची घटना घडली. या घटनेनंतर पनवेल ग्रामीण परिसरातील महिलांच्या सूरक्षेचा प्रश्न एेरणीवर आला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वलप गावाजवळील गणेशनगर येथे ४९ वर्षीय संगीता आगवणे या कुटूंबासोबत राहत होत्या. सोमवारी रात्री खासगी शिकवणी घेऊन संगीता या घरी न परतल्याने त्यांच्या कुटूंबियांनी त्यांचा शोध सूरु केला. रात्री उशीरापर्यंत पावणेबारा वाजता परिसरातील नागरिकांनी शोधाशोध केल्यानंतर संगीता यांचे शव गवतामध्ये सापडले. संगीता यांचे शव पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी नेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी गळा दाबून खून केल्याचा अहवाल पोलीसांना दिल्यावर पनवेल तालुका पोलीसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा पोलीस ठाण्यात नोंदविला. संगीता यांचा मुलगा संदेश याने पोलीसांना दिलेल्या तक्रारीनूसार संगीता यांच्या अंगावरील सर्वच दागीने चोरट्यांनी लुटल्याचे पोलीसांनी तक्रारीत नमूद केले. या दागीन्यांची किंमत एक लाख ९५ हजार रुपये आहे. पोलीसांची विविध पथक या खून्यांचा शोध घेत आहे.