दोन वर्षे ऑनलाईन शिक्षक बदलीमध्ये राज्य सरकारने अभ्यासगट नेमला होता. मात्र बदलीसाठी विकसित केलेल्या साॅफ्टवेअरमध्ये संवर्ग एक व दोनमध्ये शिक्षकांच्या दुर्धर आजाराबद्दल कोणतीही शिथीलता ठेवली नाही. यामुळे राज्यात जे शिक्षक किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटूंबिय दुर्धर रोगाने ग्रासले आहेत त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. विविध शिक्षक संघटनांनी व शिक्षकांच्या प्रतिनिधींनी याबद्दल नाराजी व्यक्त केली असून राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन आणि या विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे या समस्येवर तातडीने तोडगा काढतील यासाठी भेटींचे सत्र सूरु झाले आहे. सोमवारचा दिवस हा ऑनलाईन शिक्षक बदल्यांचा शेवटचा असल्याने या बदलीबाबतच सरकार काही निर्णय घेईल का याकडे शिक्षकांसह त्यांच्या कुटूंबियांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा >>>कर्नाळा किल्ला संवर्धनाचा अहवाल वन विभागाकडे सुपूर्द
कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार बाळाराम पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी लेखी ग्रामविकास मंत्री महाजन यांच्याकडे या समस्येकडे निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. १८ नोव्हेंबरपासून संवर्ग एक व दोन मधील शिक्षकांना होकार व नकार देण्याकरीता अाॅनलाईन बदली पोर्टल सूरु करण्यात आले. शासन निर्णयानूसार नव्याने लाभ घेणा-या शिक्षकांना संवर्ग एक व दोन सेवेची कोणतीही अट नाही. मात्र एकदा संवर्ग एक व दोनचा लाभ अथवा बदली केल्यास पुढील तीन वर्षे बदली बदली करता येणार नाही असे नमुद करण्यात आले आहे. सध्या स्थितीत बदली करीता अर्ज करणारे शिक्षक हे संवर्ग एक व दोन यापूर्वी लाभ न घेतलेले शिक्षक आहेत. परंतू त्यांनाही शाळेची तीन वर्षांची सेवा पुर्ण झाली नसल्याचा संदेश येत असल्याने हा घोळ झाल्याचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे नव्यान आॅनलाईन शिक्षक बदलीत लाभ घेणा-यांसाठी पोर्टलवर होकार नोंदविण्याकरीता कोष्टक उपलब्ध करुन द्यावे अशी विनंती शिक्षकांचे प्रतिनिधी करीत आहेत.
हेही वाचा >>>नवी मुंबई: उरण चारफाट्यावरील अंधाराचा बळी; दुचाकीच्या धडकेने तरुणाचा मृत्यू
२१ फेब्रुवारी २०१८साली भाजपची सत्ता असताना त्यांनी स्पष्ट परिपत्रक काढत संवर्ग एक व दोन करीता सेवेची अट लागू नाही. मात्र त्यानंतर ७ एप्रील २०२१ मध्ये आलेल्या शासननिर्णयात सरकारने संदिग्धता का ठेवली असा शिक्षकांचा प्रश्न आहे. ऑनलाईन पोर्टलमध्ये याविषयी शिक्षकांनी प्रश्न विचारल्यावर त्यास प्रतिसाद मिळत नाही. दोन वर्षे अभ्यास गट यासाठी स्थापन केला तो वेळ वाया गेला. एखादा शिक्षक कर्मचारी किंवा त्यावर अवलंबून असणा-याला दुर्धर आजार झाल्यास त्याला दोन महिने झाल्यानंतर ऑनलाईन बदली प्रक्रीया सूरु झाल्यास अशा शिक्षकांसाठी काय धोरण आहे याबाबत पोर्टलवर साशंकता आहे. अनेक शिक्षक व शिक्षिका त्यांच्या कुटूंबियांपासून दूर राहतात. राज्य भरातील अशा शिक्षकांचा हा प्रश्न आहे.