ट्रान्स हार्बर मार्गावरील जुईनगर रेल्वे स्थानकातील सिग्नल पॉईंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. आज सकाळी ११ ते १२.३० दरम्यान दीड तास प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला होता.

हेही वाचा- नवी मुंबई: पामबीच मार्गावर भीषण अपघात; दोन जण गंभीर जखमी

ट्रान्स हार्बर मार्गावरील जुईनगर रेल्वे स्थानकानजीक सिग्नल पॉईंटमध्ये बिघाड झाल्याने काही वेळासाठी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. या दरम्यानच्या एक ते दीड तास रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला होता. हार्बर मार्गवरील ट्रेन ही १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. तर ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी,नेरुळ, पनवेल लोकल १५मिनिटं उशिरा होत्या.

हेही वाचा- पनवेल: पैसे उडविणा-या गिऱ्हाईकावरून बारबालांची आपसात मेकअपखोलीत धुमश्चक्री

पनवेल हुन येणाऱ्या ठाणे लोकल १०-१५ मी लेट होत्या तर वाशी हुन ठाणेच्या दिशेने जाणारी एक लोकल रद्द करण्यात आली होती तर १२.१२ची ट्रेन १२.२८ला वाशी रेल्वे स्थानकात आली. दरम्यान अचानक काही वेळासाठी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला होता.

Story img Loader