उरण : तालुक्यातील चिरनेर गावात भक्ष्याच्या शोधात लोकवस्तीत शिरलेल्या दहा फूट अजगराने जिवंत मांजर गिळली. या अजगरला सर्प मित्रांनी जंगलात सोडून जीवदान दिले. मंगळवारी चिरनेर येथील नागरिकाच्या अंगणात तब्बल दहा फूट लांबीचा अजगर आढळून आला होता. किशोर पाटील यांच्या अंगणात मोठा साप दिसून आला होता. यामुळे, फ्रेंड्स ऑफ नेचर या सर्पमित्र संघटनेला पाचारण करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> फेसबुकवरील मैत्री भोवली, पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेला अन्य पुरुषावर ठेवलेला विश्वास भोवला, आर्थिक फसवणूक 

यावेळी, जयवंत ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन त्याला पकडले. मात्र या सापाने अंगणातील मंजरीच्या पिल्लाचे भक्ष्य केल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितल्याने त्या सापाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर, या सापाचे वजन हे सुमारे २० किलो असून त्याला गावाजवळ असलेल्या जंगलात सोडण्यात आले. मागील आठवडाभरात फ्रेंड्स ऑफ नेचरच्या संघटनेमार्फत विषारी नाग, मण्यार अशा सुमारे २३ विविध सापांची सुटका करण्यात आली आहे. तर, यामध्ये दुर्मिळ असलेला फॉस्टन कॅट स्नेक ( मांजऱ्या) साप सुद्धा सुटका करण्यात आली.