पनवेल  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्यावतीने लीना गरड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या पदाधिका-यांनी राजीनामास्त्र उघारुन शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा जाहीर प्रचार सूरु केल्याने निवडणूकीला अवघे १२ दिवस शिल्लक असताना स्थानिक शिवसैनिकांची सुटलेली साथ ही गरड यांना परवडणारी नसून गरड या प्रचारात पिछाडीवर आणि एकाकी पडल्याचे चित्र आहे. पनवेलमधील ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक, मराठा समाजाची पनवेलमधील मते आणि पनवेलमधील शहरी मतदारांच्या मतांचे गणित मांडून या निवडणूकीत शिवसेनेच्या लीना गरड यांनी उडी घेतली आहे. साडेतीन लाख मालमत्ता करदात्यांपैकी अडीच लाख करदात्यांनी अजूनही कर पालिकेला दिला नसल्याने कर न भरणा-यांचा गरड यांना पाठिंबा असल्याचे गणित ठाकरेंच्या शिवसेनेच्या चाणक्यांनी मांडले आहे. परंतू प्रत्यक्षात गरड यांचा प्रचार समाजमाध्यमांवर वेगाने आणि घराच्या दारापर्यंत उमेदवार फीरताना कमी दिसत आहे.

हेही वाचा >>> खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार

accident on Palm Beach Road, navi mumbai
पाम बीच मार्गावरील अपघातात एक ठार, दोन गंभीर जखमी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Raj Thackeray
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: “शाहरूख-सलमानचे चित्रपट शुक्रवारी पडले तरी…”, राज ठाकरेंची गुहागरमध्ये टोलेबाजी!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

६ लाख ५२ हजार ६२ मतदारांपर्यंत पोहचणे पुढील काही दिवसात शक्य सुद्धा दिसत नाही. मात्र यादरम्यान गुरुवारी गरड यांची भेट कामोठे येथील शिवसेनेच्या शाखेत सेनेचे जिल्हाध्यक्ष शिरीष घरत यांनी घेऊन त्यांना उमेदवारी मिळाल्याने आणि पुढील प्रचारासाठी शुभेच्छा दिल्या. एकीकडे विरोधात असलेले शिरीष घरत यांची साथ मिळाल्याने सर्वकाही आलबेल असेल असे चित्र समाजमाध्यमांवर जात असताना शेकापचे पनवेल मतदारसंघातील उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ लावलेल्या विविध राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांच्या बैठकीमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे आणि विश्वास पेठकर यांनी बाळाराम पाटील यांचाच प्रचार करणार असे म्हणत गरड यांची साथ सोडली. म्हात्रे व पेठकर हे कट्टर शिवसैनिकांपैकी एक असल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्त शिवसैनिकांचा गरड यांना विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा >>> १५ हजार मतदारांचे सोसायटीतच मतदान, बेलापूरमध्ये १२ तर ऐरोलीत २ गृहसंकुलांत केंद्रे

अनेक शिवसैनिकांनी परजिल्ह्यातील मूळ रहिवाशी असणा-या लीना गरड यांना उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पनवेलच्या उमेदवारीमुळे नाराजी व्यक्त न करता गप्प बसण्याची भूमिका घेतली. मात्र शिवसैनिकांची ही मते बाळाराम पाटील यांच्या पदरात पडण्यासाठी शेकापचे पदाधिकारी आग्रही आहेत. निवडणूकीला १२ दिवस शिल्लक असेपर्यंत शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेचा आशिर्वाद मिळेल असा आशावाद व्यक्त केला आहे. त्यामुळे शेकापचे पाटील हे कोणत्या नव्या राजकीय चमत्कारावर हा आशा व्यक्त करतात याकडे शेकापचे कार्यकर्ते लक्ष ठेऊन आहेत. शेकापला ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ हवी असली तरी सेनेत एकाकी पडलेल्या लीना गरड यांनी कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल आणि खारघर येथील शहरी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर केल्याचे सांगीतले जात आहे.