पनवेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्यावतीने लीना गरड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या पदाधिका-यांनी राजीनामास्त्र उघारुन शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा जाहीर प्रचार सूरु केल्याने निवडणूकीला अवघे १२ दिवस शिल्लक असताना स्थानिक शिवसैनिकांची सुटलेली साथ ही गरड यांना परवडणारी नसून गरड या प्रचारात पिछाडीवर आणि एकाकी पडल्याचे चित्र आहे. पनवेलमधील ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक, मराठा समाजाची पनवेलमधील मते आणि पनवेलमधील शहरी मतदारांच्या मतांचे गणित मांडून या निवडणूकीत शिवसेनेच्या लीना गरड यांनी उडी घेतली आहे. साडेतीन लाख मालमत्ता करदात्यांपैकी अडीच लाख करदात्यांनी अजूनही कर पालिकेला दिला नसल्याने कर न भरणा-यांचा गरड यांना पाठिंबा असल्याचे गणित ठाकरेंच्या शिवसेनेच्या चाणक्यांनी मांडले आहे. परंतू प्रत्यक्षात गरड यांचा प्रचार समाजमाध्यमांवर वेगाने आणि घराच्या दारापर्यंत उमेदवार फीरताना कमी दिसत आहे.
पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट
म्हात्रे व पेठकर हे कट्टर शिवसैनिकांपैकी एक असल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्त शिवसैनिकांचा गरड यांना विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-11-2024 at 14:05 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
TOPICSपनवेलPanvelमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)Shivsena UBT
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray shiv sena divide in panvel ahead of maharashtra assembly election 2024 zws