नवी मुंबई: नवी मुंबईतील सानपाडा स्टेशननजीक दुचाकीवरून आलेल्या युवकांनी एका व्यक्तीवर अंधाधुंद गोळीबार केला. एकूण पाच गोळ्या झाडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु आहे. जखमी व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील डी मार्टनजीक सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. दुचाकीवरून दोन व्यक्ती आल्या त्यांनी गाडी थांबवत पाच गोळ्या झाडल्या. यात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. ही घटना ज्या याठिकाणी घडली तो परिसर कायम गर्दी असणारा आहे. अशा गर्दीतून गोळ्या झाडणारे आपली दुचाकी सुसाट वेगाने काढून पसार झाले. 

हेही वाचा – उरणच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक वर्षभर १५० पार

हेही वाचा – नवी मुंबईत २६६ मद्यपींना दट्ट्या

ही माहिती मिळताच सानपाडा पोलीससह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटना स्थळी दाखल झाले आहेत.  परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज दहाणे यांनी घटनेला दुजोरा आहे. गोळ्या झाडणारे नेमके कुठल्या दिशेने आणि कुठे पळाले याचा तांत्रिक शोध घेणे सुरु आहे तसेच चारही दिशेला पथके रवाना झालेली आहेत.  जखमी व्यक्तीवर उपचार सुरु आहेत. पाच गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहीती प्राप्त झाली आहे.  जखमी व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane youths who came on a two wheeler near sanpada station gun fire at person ssb