नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सभागृहाची सदस्य म्हणून काम करताना तेव्हाच्या मोजक्या आर्थिक बजेटमध्ये नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा पुरविण्याचा वसा वर्ष कायम राखत आज नवी मुंबईला देशातील अग्रमानांकित शहर म्हणून नावाजले जात आहे. याचा आनंद व्यक्त करीत बेलापूर विधानसभा सदस्य मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईच्या प्रगतीत सर्व घटकांचे अनमोल योगदान असल्याचे मत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त विष्णुदास भावे नाटयगृह येथे आयोजित वर्धापनदिन सोहळयाप्रसंगी त्या आपल्या मनोगत व्यक्त करीत होत्या.

करोना काळाने आपल्याला खूप काही शिकविले. आपल्या जवळची माणसे गेल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारालाही आपण उपस्थित राहू शकलो नाही याचेही दु:ख आपण पचवले. या काळात नवी मुंबई महानगरपालिकेने महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांप्रमाणेच शेजारील शहरांमधील नागरिकांनाही उत्तम आरोग्य सेवा पुरविल्या. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य सेवा अधिक सक्षमीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व सुजाता ढोले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, सोमनाथ पोटरे, मंगला माळवे, अनंत जाधव, सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Pankaj Tripathi shares recipe for his ‘special’ masala chai
पंकज त्रिपाठी मसाला चहामध्ये टाकतात तमालपत्र! चहामध्ये तमालपत्र घालावे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
Common lifting mistakes and how to avoid them
Lifting Heavy Objects Tips : जड वस्तू उचलताना तुम्हीसुद्धा श्वास रोखून ठेवता का? मग थांबा! डॉक्टरांचा हा सल्ला वाचा
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास

हेही वाचा >>> नववर्ष व वर्धापनदिनानिमित्त नवी मुंबई पालिका मुख्यालयावर रोषणाई; नागरीकांची गर्दी

अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी मनोगतात मागील वर्षभरात नवी मुंबई महानगरपालिकेस मिळालेल्या राष्ट्रीय, राज्य स्तरावरील पुरस्कार, सन्मान यांचा विशेष उल्लेख केला. नवी मुंबई महानगरपालिकेला मिळालेल्या सर्व सन्मानात अधिकारी, कर्मचारी यांच्या कामगिरीचा महत्त्वाचा वाटा असून त्यासोबतच स्वच्छतेमधील देशात तृतीय व राज्यातील प्रथम क्रमांकाच्या मानांकनात आपले स्वच्छता कर्मचारी व जागरुक नागरिक यांच्या सक्रिय सहभागाचाही सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

आज ३१ वा वर्धापन दिन साजरा करीत असताना यापुढील काळात आपल्या शहराची मानांकने अधिक उंचावत राहण्याचा निर्धार त्यांनी अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने व्यक्त केला.याप्रसंगी डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेले वैदयकीय अधिकारी  सेवानिवृत्तीनिमित्त विशेष सन्मान करण्यात आला.वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण दिवसभर महानगरपालिका अधिकारी – कर्मचारीवृंदाचे गीत, नृत्य, नाटय आदी कलागुणदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.