नवी मुंबई: नवी मुंबईत राहणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी ५० वर्षीय आरोपीला अटक करण्यात आले आहे. ही घटना २०२० आणि २०२२ दरम्यान घडली असून काही दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे.
महेंद्र म्हात्रे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबातील ९ वर्षीय मुलीवर हा प्रसंग गुदरला आहे. घरी पत्नी नसताना म्हात्रे हा शेजारी राहणाऱ्या ९ वर्षीय मुलीला धमकी देऊन लैंगिक अत्याचार करीत होता. हा प्रकार २०२० ते २०२२ दरम्यान अनेकदा झाला. आरोपीने या चिमुरडीचे शूटिंग केले आहे. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या कुटुंबियांना ही बाब लक्षात आली. त्यामुळे त्यांनी तडक पोलीस ठाणे गाठले. याबाबत पोलिसांनी पीडित मुलीशी संवाद साधत तिला बोलते केले व सर्वच प्रकार समोर आला.
हेही वाचा… पनवेल मालधक्का परिसरात तरुणाची हत्या
सध्या पीडितेचे वय तेरा आहे. पोलिसांनी तात्काळ म्हात्रे याला अटक केली असून त्याच्या विरोधात धमकी, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. आरोपीच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने दोन विवाह केल्याचेही समोर आले आहे, अशी माहिती एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली.