नवी मुंबई : जबरी चोरी करताना फिर्यादीला हेल्मेटने मारहाण करून पळून जाणाऱ्या आरोपींना पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने अटक केली आहे. आरोपीकडून फिर्यादींचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे.आदित्य राजेश महाडीक, करण सोमदत्त सिंग अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या विशीतील आरोपींनी १७ एप्रिलला देवानंद खंदारे यांना पनवेल येथील डोंबाला कॉलेजच्या बाजूला, महादेव मंदिराजवळ लुटण्याच्या उद्देशाने अडवून जबर मारहाण केली. मारहाण करून त्यांच्याकडील विवो कंपनीचा मोबाइल, टायटन कंपनीचे घड्याळ, रोख रक्कम रुपये ५ हजार ५८०, ए.टी.एम. कार्ड व मोटार सायकलची बॅटरी घेऊन ते पळून गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या प्रकरणी १९ तारखेला गुन्हा दाखल झाल्यावर वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादमाने यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासमवेत घटनास्थळी भेट देऊन संशयित इसमांकडे चौकशी केली. तसेच तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांकडून माहिती काढून आरोपींचा शोध घेतला. आरोपी कारंजाडे येथे येणार असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी आदित्य आणि करण यांना ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेला विवो कंपनीचा मोबाइल व फिर्यादीला मारहाण करण्यासाठी वापरलेल्या हेल्मेटचे तुकडे जप्त केले आहे. तसेच या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.