पनवेल: दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक ४५० च्या पुढे रविवारी नोंदविला गेला, तर महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील कळंबोली या उपनगरातील महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाने कायमस्वरुपी लावलेल्या वायू गुणवत्ता निर्देशांक मोजमापासाठी लावलेल्या तपासणी यंत्रात मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता वायू गुणवत्ता निर्देशांक ३३० वर पोहचल्याने कळंबोलीकरांसोबत पनवेलकरही धास्तावले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लावलेल्या या तपासणी यंत्रावर देखरेख करण्यासाठी रात्रपाळीला कोणतेही अधिकारी नाहीत. तसेच नेमकी हवेची गुणवत्ता का ढासळतेय याचा अभ्यास करणारी कोणतीही यंत्रणा नसल्याने नागरिकांना रात्रपाळीकरुन वायू प्रदूषणाचा शोध घेण्याची वेळ आली आहे. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता खारघर येथील रहिवाशी कळंबोली येथील वायू गुणवत्ता तपासणा-या मीटरकडे रात्रभर लक्ष देऊन होते.

मागील चार दिवसांपासून पनवेलच्या हवेमध्ये धूरक्यांसोबत धुलीकणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंंत्रण मंडळाने (एमपीसीबी) तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर असेच एक यंत्र प्रदूषण मोजमापासाठी बसवले आहे. काही दिवसांपूर्वी या यंत्रांत बिघाड झाला होता. मात्र मंगळवारी रात्री या यंत्रात दर्शविलेला वायू गुणवत्ता निर्देशांक १८० हून कमी असल्याचा नोंदविला होता. खारघरमध्ये राहणारे शिंदे गटाचे पदाधिकारी मंगेश रानवडे आणि पर्यावरणावर काम कऱणा-या कार्यकर्त्या ज्योती नाडकर्णी यांनी याविषयी समाजमाध्यमांवर मंगळवारी रात्री लक्ष वेधले. रानवडे व नाडकर्णी या दोघांनी रात्र जागून कळंबोलीतील हवेची गुणवत्ता तपासणा-या यंत्रातील घेतलेल्या नोंदीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकारी यावर काय कार्यवाही करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पनवेलच्या पश्चिमेला आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम दिवसरात्र सूरु आहे. पनवेलच्या भोवताली ८० विविध खदाणींमधून खडी व दगड उत्खणण सूरु आहेत. पनवेलच्या उत्तरेला तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये नागरी घनकचरा प्रकल्पासोबत ६० घातक रसायनांची हाताळणी करणारे कारखाने तसेच घातक व टाकाऊ रसायनांची विल्हेवाट लावणारा मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प आहेत. पूर्वेला बडोदा मुंबई महामार्गाचे काम दिवसरात्र सूरु आहे. यामुळे हवेच्या दिशेने वायुतील प्रदुषण परिसरात पसरत आहेत. यामुळे श्वसनदाह रुग्णांची संख्या वाढते आहे.

Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
Weather forecast for North Maharashtra Marathwada Vidarbha
राज्यात ऐन हिवाळ्यात पाऊस, गारपीट होणार? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये काय होणार
Mumbai citizens suffer from cold and cough due to polluted air
प्रदुषित हवेमुळे मुंबईकर सर्दी, खोकल्याने त्रस्त

हेही वाचा >>>आता मैदानांच्या जमिनीवर शाळा, शाळांच्या पुनर्विकासासाठी नवे धोरण; वाढीव चटई निर्देशांक वापराची व्यवस्थापनांना मुभा

प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेचे बांधकाम व्यवसायावर लक्ष्य

न दिसणारे हवेतील प्रदूषण असल्याने पनवेल पालिकेच्या वैद्यकीय विभागाने श्वसनदाह रुग्णांना अधिकची खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी मंगळवारी सायंकाळी पनवेलमध्ये बांधकाम व्यवसायिकांच्या विविध संघटनेच्या ३० हून अधिक विकसकांची तातडीची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत तातडीने सर्व बांधकाम सूरु असलेल्या सर्वच ठिकाणी बांधकाम प्रकल्पांच्या भोवती किमान २५ फूट उंचीचे धातूचे पत्रे लावणे, बांधकाम चालू असणाऱ्या सर्व इमारती तसेच पाडण्यात आलेल्या सर्व इमारतींच्या भोवती ओल्या हिरव्या कापडाने, ओल्या तागाच्या कापडाने, ताडपत्रीने तो परिसर बंदिस्त करावा, तसेच पुढील पंधरा दिवसात बांधकाम ठिकाणी स्प्रिंक्लर्सच्या साह्याने व वाटरगनच्या साह्याने बांधकामठिकाणी धुळ वाढू नये यासाठी पाण्याचा मारा करण्याचे आदेश दिले. सीसीटिव्ही प्रत्येक बांधकाम सूरु असलेल्या ठिकाणी तसेच बांधकाम साहीत्याची वाहतूक होत असलेल्या ठिकाणी मोबाईल अँटी स्मॉग गन च्या सहाय्याने मालाची नेआण करण्याच्या ठिकाणी पाणी फवारणी करणे बंधनकारक करण्याचे सूचविले. वाहनातून कोणत्याही प्रकारे गळती होऊ नये तसेच ओव्हरलोड होऊ नये, ह्याची दक्षता घेणे बंधनकारक असणार आहे. तसेच डंपरमधून हवेत रेती खडी यांमधून धुळ जाऊ नये यासाठी आच्छादन लावण्याच्या सूचना दिल्याची माहिती पालिका उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली. बांधकामाच्या ठिकाणी ग्राईडिंग, कटिंग, ड्रीलिंग, सोईंग आणि ट्रिमिंग ची कामे बंदिस्त भागात करावी, टाकाऊ माल उतरवल्यानंतर वाहन पूर्ण स्वच्छ करणे बंधनकारक असेल, बांधकाम साहित्य आणि डेब्रिज वाहून नेणारी वाहने ह्यांच्यावर वाहन ट्रेकिंग यंत्रणा बसवणे विकासकांना बंधनकारक असणार आहे. तसेच ही नियम न पाळणा-या तसेच ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांचे वाहन तत्काळ जप्त करण्याबाबत पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे विकासकांना पालिकेने सूचविले आहे.

Story img Loader