नवी मुंबई: नवी मुंबईतील नेरुळ येथे एका झोपडपट्टीत तीन बांदलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनी बेकायदा भारतात प्रवेश केला असून यातील दोघांनी १२ वर्षांपूर्वी आपल्या पालकांच्या समवेत तर तिसऱ्या आरोपीने ६ वर्षांपूर्वी पती समवेत भारतात प्रवेश केल्याचे समोर आले आहे.
अहदुल इंजील मुल्ला, रत्ना अहदुल इंजील मुल्ला, आणि रिपा बिश्वास अशी यातील आरोपींची नावे आहेत. यातील अहदुल इंजील मुल्ला आणि रत्ना हे बांगलादेशातील जांगरी लंगडा गावातील रहिवासी आहेत तर रत्ना बांगलादेशातील मिर्जापूर येथील रहिवासी आहे. अहदुल इंजील मुल्ला (वय २६), रत्ना अहदुल इंजील मुल्ला (२१) हे दोघे १२ वर्षांपूर्वी आई वडिलांच्या समवेत भारतात आले होते. यांच्या आई वडिलांच्या विरोधात पारपत्र कायद्यांतर्गत २०११ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा… एपीएमसीत आगीशी खेळ; ज्वलनशील पदार्थ, बेकायदा बांधकामे, सुरक्षेची ऐशीतैशी
तर रत्ना (वय ३६) हि ६ वर्षांपूर्वी आपल्या पतीसमवेत भारतात आली होती. हे तिघेही नेरुळ येथील अपोलो रुग्णालय नजीक असलेल्या झोपडपट्टीत राहतात. या तिघांच्या बाबतीत दहशदवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर त्यांनी तिघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकडे भारतीय असल्याची कुठलेही कागदपत्रे नव्हती. त्यांनीही स्वतः बांगलादेशी असल्याची माहिती दिल्यावर त्यांच्यावर पारपत्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.