वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात उष्म वातावरणामुळे सध्या खराब, सुकेलेल्या पालेभाज्या दाखल होत आहेत, त्यामुळे पालेभाजीचा दर्जा खालावत आहे. मागील आठवड्यापासून मेथीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र कोथिंबीरसह इतर पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. बाजारात दाखल होणाऱ्या पालेभाज्यांपैकी ३५ ते ४० टक्के भाज्या सुकत असून खराबही होत आहेत.

उन्हाळ्यात भाजीपाल्याचे दर वधारतात, मात्र पावसाळा सुरू होताच आटोक्यात येतात. यंदा समाधानकारक पाऊस पडत नाही. मध्येच पावसाच्या तुरळक सरी बसरत असून दीर्घकाळ पावसाने उसंत घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाळ्या ऋतूतही सध्या कडक उन्हाळा जाणवत असून वातावरणात उष्णता वाढली आहे. त्यामुळे बाजारात पालक, शेपू, पुदिना, मेथी आणि कोथिंबीरची आवक वाढली आहे, मात्र यामध्ये उष्म्याने ३५ ते ४० टक्के पालेभाज्या सुकत असून खराब होत आहेत. त्यामुळे या आठवड्यात दर स्थिर आहेत.

Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
soybean procurement target for 2024 25 has adjusted based on district responses
राज्यात सोयाबीन खरेदीमध्ये सहा जिल्ह्यांच्या उद्दिष्टांना कात्री
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
सतीश आळेकर यांना ‘जनस्थान’; १० मार्च रोजी नाशिकमध्ये पुरस्काराने गौरव
Shetkari sangharsh samiti demands cancellation of Pune-Nashik Industrial Expressway pune
पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा; शेतकरी संघर्ष समितीची मागणी
pune tomato prices fall
टोमॅटोचे भाव घसरले, शेतकरी हवालदिल
kolhapur tamdalge village ropvatika
लोकशिवार : रोपवाटिकेचे गाव!

हेही वाचा – वाशी-कोपरखैरणेच्या वेशीवर प्रदूषण कायम; शनिवारी रात्री वाशी-कोपरीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३०१ वर

हेही वाचा – तळोजावासी पाण्यासाठी सिडको कार्यालयाबाहेर

सोमवारी एपीएमसीत ५९२०० क्विंटल मेथी आवक असून प्रतिजुडी बाजारभाव १० ते १२ रुपये, कोथिंबीर १९५९०० क्विंटल आवक असून ८ ते १० रुपये, १४७०० क्विंटल शेपूला ७ ते ८ रुपये, पुदीना ७१६०० क्विंटल दाखल झाला असून ४ ते ५ रुपये, तर पालक १६३८०० क्विंटल आवक झाली असून ६ ते ८ रुपये दराने विक्री होत आहे.

Story img Loader