पनवेल: तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये महिन्याभरापूर्वी राज्याचे उद्योगमंत्री उद्योजकांच्या भेटीसाठी आले होते. त्यामुळे वसाहतीमधील मुख्य कॉंक्रीटच्या रस्त्यावर गतिरोधकाची दुरुस्ती करुन खड्डे पडलेल्या गतिरोधकाला डांबरीकरणाचा लेप लावण्यात आला होता.

मंत्र्यांची बैठक पार पडली आणि सतत पडणा-या पावसाळ्यात गतिरोधकावरील डांबराचा लेप गायब झाला. पुन्हा तळोजात जीवघेणे गतिरोधक तयार झाले आहेत. याबाबत स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी पत्र देऊन या गतिरोधकांची डागडुजी करण्याची विनंती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे केली आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन

हेही वाचा… पनवेल: सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

२४ जुनला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये येऊन उद्योजकांच्याा प्रतिनिधींची भेट घेतली होती. या भेटीपूर्वी तळोजातील मुख्य रस्त्यावरील गतिरोधकांवरील डांबर निघून गेले होते. त्यामुळे उद्योगमंत्र्यांसमोर सामान्य प्रवाशांना भेडसावणारी समस्या दिसू नये म्हणून औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिका-यांनी तातडीने गतिरोधकांवर डांबर लावून गतिरोधक ठीकठाक केले. परंतु महिन्याभरानंतर गतिरोधकावरील तात्पुरता डांबराचा लेप निघून गेल्याने गतिरोधक धोकादायक झाले आहेत. याविषयी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूनील कदम यांनी तळोजा येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाकडे लेखी पाठपुरावा केला आहे.