नवी मुंबई: एपीएमसी मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आतापर्यंत अनधिकृत जागेवर बार अश्या बातम्या पाहिल्या असतील मात्र नवी मुंबईतील तुर्भे विभागात सार्वजनिक शौचालयाचे बारमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहर प्रमुख विनोद पार्टे यांनी केला आहे. एपीएमसी ट्रक टर्मिनल जवळ येणाऱ्या नागरिकांसाठी हे शौचालय बांधण्यात आले होते.

यालगत असणाऱ्या एका बार व्यवसायिकाने त्यावर अतिक्रमण करीत या शौचालयाच्या आतमध्ये थेट बारची निर्मिती केलीय. बार मालकाने अधिकाऱ्यांना हाताशी धरूनच हे धाडस केले आहे, असा आरोप पार्टे यांनी केला आहे. काही मनसे कार्यकर्त्यांनी याठिकाणी जात हे प्रकरण बाहेर काढल्याने ही धक्कादायक बाब समोर आणली.

हेही वाचा >>> उरण शहरातील बेशीस्त कोंडीचा १२ वीच्या परीक्षार्थींना फटका, पहिल्या दिवशीच कोंडीचा परीक्षार्थींना फटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात शौचालयाचे बार होत असतील तर संबंधित शासकीय यंत्रणा काय करते हा प्रश्न नवी मुंबईकरांना सतावत आहे. यात मनपाच्या अधिकाऱ्याचा हस्तक्षेप असल्याचा आरोप करत यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे. या ठिकाणी बारच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता बार मालक कोण या विषयी माहिती नसल्याचे सांगण्यात आले. मात्र सदर शौचालय हे महानगर पालिकेच्या मालकीचे नसून सिडकोकडे आहे. त्यामुळे त्याच्यावर सिडकोचा अधिकार आहे. सदर परिस्थिती बाबत सिडकोला पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.