उरणच्या मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का या जलमार्गावर रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवेचा आराखडा २०१८ मध्ये तयार करण्यात आला होता. तेव्हा मोरा रो रो जेट्टीचा अपेक्षीत खर्च ६४ कोटी होता. मात्र हा प्रकल्प चार वर्षे लांबल्याने जेट्टीचा खर्च ६४ कोटीवरून ७४ कोटींवर गेला आहे. त्यामुळे १० कोटींनी खर्च वाढला आहे. मात्र या रो रो सेवेमुळे मुंबईतून उरणला व उरण वरुन मुंबईला प्रवाशांना आपल्या चारचाकी व दुचाकीवरून ही प्रवास करता येणार आहे. त्यामुळे वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ व इंधन याची बचत होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबई: “प्ले – वेस्ट सेग्रीगेशन” या इन्स्टाग्राम गेममधून मुलांवर कचरा वर्गीकरणाचे संस्कार

उरणला समुद्री मार्गाने जोडण्यासाठी अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. यामध्ये उरण ते अलिबाग दरम्यानच्या रो रो सेवेसाठी करंजा जेट्टी तयार होऊन पाच वर्षे झाली आहेत. तर अलिबागमधील रेवस जेट्टीचे काम सुरू आहे. अशाच प्रकारची रो रो सेवा उरणच्या मोरा ते मुंबई या जलमार्गावर रो रो सेवा प्रस्तावित आहे. त्याच्या कामाला काही दिवसात सुरुवात होणार आहे. मात्र ही रो रो सेवा सुरू झाल्याने मोरा परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रो रो सेवेपूर्वी मोरा जेट्टीवरील रस्त्याच्या रुंदीकरण किंवा रो रो साठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था करण्याची मागणी होऊ लागली आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : भास्कर जाधवांसह ठाकरे गटाच्या चार बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल, प्रक्षोभक विधानं केल्याचा आरोप

मोरा रो रो सेवेला चार वर्षांपूर्वीच मंजुरी मिळालेली आहे. त्यावेळी जेट्टीसाठी ६४ कोटी होता. यामध्ये दहा कोटींची वाढ झाली असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली आहे. त्याच प्रमाणे दगड खाणी सुरू झाल्यानंतर ताबडतोबीने जेट्टीच्या कामाला सुरुवात होणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The cost of mora ro ro jetty increased by 10 crores navi mumbai dpj
Show comments