कळंबोली पाठोपाठ कोपरखैरानेतील नटराज बारवर गुन्हे शाखेने धाड टाकली आहे. नटराज बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने रात्री १२ च्या सुमारास धाड टाकली. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच या ठिकाणी कोपरखैरने पोलिसांनीही धाड टाकली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पनवेल येथील कळंबोली परिसरात असलेल्या कपल डान्स बारवर धाड टाकल्याववर कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह अन्य एका सहाय्यक पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई झाली तरीही अनेक ठिकाणी डान्स बार सुरूच आहेत. अशाच प्रकारे कोपरखैरने येथे सुरु असलेल्या नटराज बार वर गुन्हे शाखाने काल अपरात्री (बुधवारी) धाड टाकली, त्यावेळी अनेक आक्षेपार्ह घटना समोर आल्या. रात्री साडेबारापासून सुरू असलेली ही कारवाई पहाटेपर्यंत सुरूच होती. या प्रकरणी काही महिलांना आणि बार व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याला गुन्हे शाखा सहाय्यक आयुक्त अजय कदम यांनी दुजोरा दिला आहे.

आयुक्त संजीवकुमार यांनी डान्स बार विरोधात उघडलेल्या मोहिमेची माहिती सर्वत्र असूनही ज्या पद्धतीने अनेक छुपे डान्स बार सुरु आहेत त्यावरून डान्स बार मालक कुणाच्या जीवावर एवढे निर्ढावले आहेत हे “”ओपन सिक्रेट“ आहे.