घरपोच खाद्यपदार्थ पोहचविणा-या एका नामांकित कंपनीच्या डीलेव्हरी बॉयने खाद्यपदार्थ ग्राहकाच्या घरी दिल्यावर त्या खाद्यपदार्थाची रक्कम घेतली. त्यानंतर संबंधित घरात ही तरुणी एकटीच असल्याचा फायदा उचलत या डीलेव्हरी बॉयने चक्क तरुणीचा विनयभंग केला. या घटनेने बावरलेली तरुणी स्वताच्या घरात पळाली. या दरम्यान तो डीलेव्हरी बॉय तेथून पसार झाला. पनवेल येथील कोन गावानजीक असलेल्या इंडीयाबुल्स या इमारतीमध्ये मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सूमारास ही घटना घडली आहे. संबंधित तरुणी ही शिक्षण घेत असून तीने घडलेला प्रकार ताातडीने पोलीसांना सांगीतला. तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र दौंडकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरिक्षक अंकुश खेडकर यांना या प्रकरणी डीलेव्हरी बॉयचा शोध घेण्याचे आदेश दिले.

हेही वाचा >>> उरण : करळ उड्डाण पुलाखाली कंटेनर वाहनांच बसस्थान

पोलीसांनी तक्रार नोंदविल्यानंतर संबंधित खाद्यपदार्थ घरपोच सेवा देणा-या नामांकीत कंपनीकडून संबंधित डीलेव्हरी बॉयचा घरचा पत्ता शोधून काढण्यात आला. मात्र तो तेथूनही फरार झाला होता. या घटनेनंतर पोलीसांनी ग्राहकांना डीलेव्हरी बॉयकडून व्यवहार करताना सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे. डीलेव्हरी बॉयकडून घरातील सामान घेण्यापूर्वी घराच्या सूरक्षेसाठी लावलेला दरवाजा (सेफ्टीडोअर) किंवा दरवाजा पूर्ण उघडण्यापूर्वी दरवाजा अपुर्ण उघडेल यासाठी लावलेली लोखंडी साखळीचा वापर केल्यानंतरच व्यवहार करावे असे आवाहन केले आहे. तसेच डीलेव्हरी बॉय नेमताना संबंधित कंपनी व्यवस्थापनाने सुद्धा त्या कामगारांचे चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र तपासून नंतरच त्यांना नोकरी दिल्यास अशा घटना रोखण्यास मदत होईल असे पोलीसांनी सांगीतले.

Story img Loader