नवी मुंबईतील सीउड येथे बेकायदा उभ्या असलेल्या गाँस्पेल आश्रम व त्यातील चर्चवर अतिक्रमण विभागाने कारवाई करीत उध्वस्त केले. यावर आठ दिवसात कारवाई करा अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिला होता. येथील फादरवर बाल लैगिक अत्याचार प्रकरणी कारवाई करण्यात आली होती.
हेही वाचा- घरकाम करणारी महिलाच निघाली चोर; वृद्ध महिलेच्या अधूपणाचा फायदा घेत दागिन्यांवर मारला डल्ला
सिवूड येथील बेथेल गॉस्पेल चर्चद्वारे चालवण्यात आलेल्या बेकायदेशीर बालाश्रमामध्ये ४ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चर्चचे सर्व अनधिकृत बांधकाम नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांनी संयुक्त विद्यमाने कारवाई करून उध्वस्त केले. या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता.
या चर्चद्वारे बेकायदेशीपणे चालवण्यात आलेल्या बालाश्रमामध्ये काही मुली व महिला होत्या. २ दिवसांपूर्वी पोलिसांनी त्यांना अनेक ठिकाणी हलवले. त्यानंतर हे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी चर्चमध्ये वास्तव्यास असलेला फादर येसुदासन, त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्या विरोधात अनधिकृत बांधकाम प्रकरणी एन.आर.आय. पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे.
हेही वाचा- पनवेलच्या खाडीपात्रात वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा धडाका
दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी या चर्चला भेट दिली. त्या वेळी त्या ठिकाणी २ मुली व १ मुलगा वास्तव्यास असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर आणि पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन अनधिकृत चर्च असतांनाही ते कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले तसेच ८ दिवसांमध्ये चर्चवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस आणि महापालिका अन् सिडको प्रशासन यांनी आज (शुक्रवारी) सकाळी या चर्चेचे संपूर्ण अनधिकृत बांधकाम उध्वस्त केले. अमरीश पटनेगिरी (उपायुक्त अतिक्रमण विभाग) सदर आश्रम आणि त्यातील चर्च बेकायदा होते. सिडकोच्या जागेवर असलेल्या आश्रम व चर्चवर नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.