उरण : कोसळलेल्या साकवाच्या स्लॅबखाली सापडून मृत्यू पावलेल्या दोन्ही मजूर आदिवासींच्या कुटुंबीयांना शासनाकडून महिनाभरानंतरही आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यामुळे ही दोन्ही कुटुंबे मदतीपासून वंचित आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचे ‘धनुष्य’ गणेश नाईकांच्या खांद्यावर? ठाण्याच्या जागेसाठी मनोमिलन?

हेही वाचा – मनसेचे परप्रांतीयांविरोधातील ‘खळ्ळ्य खट्ट्याक’ बंद ? महायुतीसाठी भाजपची अट

उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील धुतुम- दादरपाडादरम्यान रहदारीसाठी वापरात असलेला जुना साकव २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अचानक कोसळला. या कोसळलेल्या साकवाच्या सिमेंट काँक्रीटच्या स्लॅबखाली दुर्दैवाने अविनाश सुरेश मिरकुटे आणि राजेश लक्ष्मण वाघमारे यांचा मृत्यू झाला होता. तर दोघेजण गंभीररीत्या जायबंदी झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही आदिवासींच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळेल अशी आशा आहे, मात्र अद्याप तरी शासनाकडून आर्थिक मदत मिळालेली नाही. याबाबत विचारणा केली असता उरण गटविकास कार्यालयाचे विस्तार अधिकारी विनोद मिंडे यांनी याप्रकरणी उरण तहसील कार्यालयाला कळविण्यात आले असल्याची माहिती दिली.