नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील खारघर ते तळोजा या पाच किलोमीटर मार्गिकेचे स्थापत्य, विद्युत तसेच भारतीय रेल्वे बोर्डाच्या विविध तपासण्या होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी ही पहिली मार्गिका सुरू करण्याचा मुहूर्त अद्याप सिडकोला लाभलेला नाही. केंद्र आणि राज्य सरकार मधील मान्यवरांच्या ‘वेळ’जुळून येत नसल्याने नवी मुंबईतील ही पहिली मेट्रो धावताना दिसून येत नाही. सिडकोने तर शुभारंभाची सर्व तयारी करून ठेवली आहे. पुरोहितांना देखील सांगून ठेवण्यात आले आहे पण ही मार्गिका सुरू करण्याचा मुहूर्त निघालेला नाही. या सहा महिन्यांच्या विलंब कालावधीत सिडकोने बेलापूर ते खारघर या सहा किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचे काम करत अंतिम टप्यात आणले असून डिसेंबर पर्यंत हा संपूर्ण ११ किलोमीटर लांबीचा नवी मुंबई मेट्रोचा पहिला मार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Ganapati Visarjan 2022 Live : आज निरोपाचा दिवस, महाराष्ट्रात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह!

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Fire At BKC Station
Mumbai Metro : मुंबईतल्या बीकेसी मेट्रो स्टेशनला आग, प्रवाशांना काढण्यात आलं बाहेर, अग्निशमन दलाचे १० ते १२ बंब घटनास्थळी
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका

हेही वाचा : शहरात मुसळधारा मोरबे क्षेत्रात मात्र रिमझिम; मोरबे धरणात ८५% पाणीसाठा

सिडकोने नवी मुंबई शहर वासविताना सार्वजनिक परिवहन सेवेचा प्रथम प्रकल्प राबविला आहे. त्यामुळे ४० वर्षांपूर्वी बेस्ट च्या धर्तीवर बीएमटीसी बससेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर मानखुर्द पासून पुढे वाशीपर्यंत रेल्वे सेवा कार्यान्वित व्हावी यासाठी खर्चाचा ६७ टक्के हिस्सा उचलून ती २८ वर्षांपूर्वी नवी मुंबईत आणली गेली आहे. नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो मार्गाचा ही मे २०११ रोजी शुभारंभ करण्यात आला मात्र पहिल्या चार वर्षात सुरू होणारी ही जलद सेवा गेली  चार वर्षे रखडली आहे. देखभाल आणि संचालनसाठी महामेट्रोच्या हाती हा प्रकल्प दिल्यानंतर तिला वेग आला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी यांच्या पुढाकारामुळे स्थापत्य वीज, तांत्रिक कामे आणि रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी झालेल्या खारघर ते तळोजा या पाच किलोमीटर मार्गिका सुरू करण्याच्या तयारीत आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकाच दिवशी एकच वेळ जुळून येत नसल्याने या सेवेचा शुभारंभ होत नाही त्यामुळे या मार्गावर दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदारचे हाल होत असून त्यांची प्रतीक्षा संपत नाही पहिल्या टप्प्यातील पहिली मार्गिका सुरू होण्यास महूर्त मिळत नाही पण याच वेळी संपूर्ण मार्गाच्या कामाने वेग घेतला असून बेलापूर ते खारघर या ६ किलोमीटर लांबीचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सिडकोच्या एका उच्च अधिकाऱ्याने स्पष्ट केले त्यामुळे पहिल्या मार्गिकेची सुरुवात आणखी तीन महिने नाही झाल्यास संपूर्ण बेलापूर ते पेंधर हा ११ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाचा शुभारंभ पुढील वर्षी एकाच वेळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.