नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील खारघर ते तळोजा या पाच किलोमीटर मार्गिकेचे स्थापत्य, विद्युत तसेच भारतीय रेल्वे बोर्डाच्या विविध तपासण्या होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी ही पहिली मार्गिका सुरू करण्याचा मुहूर्त अद्याप सिडकोला लाभलेला नाही. केंद्र आणि राज्य सरकार मधील मान्यवरांच्या ‘वेळ’जुळून येत नसल्याने नवी मुंबईतील ही पहिली मेट्रो धावताना दिसून येत नाही. सिडकोने तर शुभारंभाची सर्व तयारी करून ठेवली आहे. पुरोहितांना देखील सांगून ठेवण्यात आले आहे पण ही मार्गिका सुरू करण्याचा मुहूर्त निघालेला नाही. या सहा महिन्यांच्या विलंब कालावधीत सिडकोने बेलापूर ते खारघर या सहा किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचे काम करत अंतिम टप्यात आणले असून डिसेंबर पर्यंत हा संपूर्ण ११ किलोमीटर लांबीचा नवी मुंबई मेट्रोचा पहिला मार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे.
बेलापूर – तळोजा मेट्रो मार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता
सिडकोने नवी मुंबई शहर वासविताना सार्वजनिक परिवहन सेवेचा प्रथम प्रकल्प राबविला आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-09-2022 at 17:08 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The first phase navi mumbai metro completed december metro project kharghar taloja ysh