नवी मुंबई: झाडांच्या अधिनियमातील तरतुदीनुसार झाडांची बेकायदेशीर कत्तल केल्यास दंडाची तसेच पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. मात्र अशी तरतूद असून देखील कोपर खैरणे सेक्टर ८ मधील विनापरवाना वृक्ष तोड करणाऱ्या विरोधात उद्यान विभागाने अदखल पात्र गुन्हाची नोंद केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोपरखैरणे सेक्टर ८येथील एका भूखंडावर विकासकाकडून इमारत बांधकामाचे नियोजन आहे. या बांधकामात अडसर ठरणाऱ्या मोठ्या वृक्षांची सरसकट कत्तल करण्यात आली. यासाठी नियमानुसार महापालिका उद्यान विभागाची मंजुरी घेण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. या विरोधात बातमी प्रसिद्ध झाल्या नंतर उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला मात्र अधिनियम नुसार हा गुन्हा दाखल न करता अदखल पात्र गुन्हा दाखल केल्याचे दिसून येत आहे. परिणामी झाड तोडल्यानंतर देखील विकासक मोकाट आहे.

हेही वाचा… गणेशोत्सवापूर्वी जासई उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार; पुलावरील एक मार्गिका सुरू करणार

तत्कालीन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी बेकायदेशीर झाडांची कत्तल करणाऱ्या घटकांवर मालमत्ता विरूपण कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. असे असूनही उद्यान अधिकारी मात्र कायद्यातील पळवाटा मोकळ्या राहतील अश्या पद्धतीने गुन्हे नोंदवत असल्याने उद्यान विभागाचे कार्य पद्धतीवर आता संशय व्यक्त केला जात आहे. सध्या वृक्ष प्राधिकरण कार्यरत नसल्याने उद्यान विभागाच्या पथ्याशी पडत आहे. त्यामुळे अवैध वृक्ष तोड करणाऱ्या विरोधात ठोस कारवाई होताना दिसत नाही. कारण मागील महिन्यात सेक्टर ४ मध्ये अनधिकृत इमारतीसाठी वृक्ष कत्तल करण्यात आली होती. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी देखील महापालिका उद्यान विभागाला तक्रारीची वाट पाहावी लागली. त्यामुळे कोपरखैरणे विभागात बेसुमार अवैध वृक्ष तोडीमुळे उद्यान विभागाच्या कार्यशैलीवर सवाल उपस्थित केला जात आहे.

तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांचे काय आहेत आदेश

विनापरवानगी वृक्षतोड , वृक्षछाटणी करून पर्यावरणाला हानी पोहचविणे हा गुन्हा असून याबाबत अदखलपात्र गुन्हा (एनसी) नोंदविला जात होता. मात्र याबाबत महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, १९९५ मधील कलम २ (ग) व ३ तसेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९९५ आणि महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन नियम २००९ सह शासन आदेश अधिसूचना मधील कलम २१(१) व २ नुसार विनापरवानगी वृक्षतोड , वृक्षछाटणी करणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात येणार आहेत.

कोपरखैरणे से. ८ येथील अनधिकृतपणे वृक्ष तोडीबाबत एनसी दाखल करण्यात आली आहे. विधी विभागात फाईल पाठविण्यात आली आहे. त्यावर पुढील कारवाई होईल. – दिलीप नेरकर, उपायुक्त, उद्यान विभाग , नवी मुंबई महापालिका