पत्नीला इन्स्टाग्रामवर मेसेज करणा-याला जाब विचारायला गेल्यावर पतीलाच बांबूचे फटके खावे लागले. नवीन पनवेल वसाहतीमधील गणेश मार्केट परिसरात ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. विशेष म्हणजे या घटनेत पतीला वाचविण्यासाठी त्याचा मित्र तेथे धावून गेला त्याला मारेक-यांनी सळईने मारहाण केली. खांदेश्वर पोलीस ठाण्यात याबाबत शनिवारी मध्यरात्री गुन्हा नोंदविण्यात आला असून आतापर्यंत मारेकरी फरार आहेत.

हेही वाचा- पनवेल : स्वसूरक्षेसाठी पनवेलमधील व्यापा-यांनी ३२ सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला

पोलिसांमध्ये तक्रार दाखल

समाजमाध्यमांवर महिलांना लघुसंदेश पाठविण्याचे अनेक किस्से घडतात. नवीन पनवेल येथील विकी नरसिंगे हा एका महिलेला इन्स्टाग्रामवर लघुसंदेश पाठवित होता. घरात सांगितल्यावर तंटा नको म्हणून महिलेने स्वत: विकीला जाब विचारला. त्यानंतर ही बाब पतीला सुद्धा सांगीतली. यापू़ढे विकी संदेश पाठविणार नाही असे या पीडीत दाम्पत्याला वाटले होते. परंतू उलट लघुसंदेश पाठविणारा विकी त्या दाम्पत्याला दमदाटी करु लागला. अखेर या दाम्पत्याने पोलीसांत जाण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे खांदेश्वर पोलीस ठाण्यात संबंधित तरुण दमदाटी करत असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी सुद्धा यापुढे तो तरुण त्रास देणार नाही असा धीर पीडीत दाम्पत्याला दिला.

हेही वाचा- उरणमध्ये घुमणार रास दांडियाचा आवाज; नवरात्रोत्सवानिमित्त जागरणाचे आयोजन

मेसेज का पाठवला विचारणाऱ्या पतीलाच मारहाण

मात्र, पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्याचे कळाल्यावर विकी व त्याचा भाऊ बंटी याने त्यांच्या अजून चार मित्रांना घेवून त्या महिलेच्या पतीलाच बांबूने मारहाण केली. लोखंडी सळईने सुद्धा त्या पतीला मारण्यात आले. यादरम्यान त्या पतीचा मित्र तेथे मारहाण रोखण्यासाठी गेला मारेक-यांनी त्यालाही बेदम मारहाण केली. सोमवार उजाडला तरी खांदेश्वर पोलीस या प्रकरणातील मारेक-यांचा शोध घेऊ शकले नाहीत.

Story img Loader