नवी मुंबई : वारंवार मागणी करूनही उसने पैसे मिळत नसल्याने हवेत गोळी झाडल्याची घटना तुर्भे एमआयडीसी भागात घडली आहे. यातील आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. पुण्यात राहणारे नितीन भोसले आणि तुर्भे एमआयडिसीतील एक हॉटेल असून सदर हॉटेल डोंबिवलीतील रवीश शेट्टी यांना चालवण्यास दिली होते. मात्र काही कारणांनी सदर हॉटेल अन्य व्यक्तीला चालवण्यास दिले. मात्र यादरम्यान भोसले यांनी शेट्टी यांना पाच लाख रुपये उसने दिले होते. ते वारंवार मागणी करूनही पैसे परत दिले जात नव्हते. मंगळवारी रात्री या दोघांची भेट तुर्भे एमआयडिसीतील कुंभनाथ एंटरप्राइजेस येथे झाली. त्यावेळी पैशांचा विषय निघाला असता शेट्टी यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे ते पैसे परत देत नाही आता मी काय करू असे म्हणत परवाना असलेले पिस्तूल बाहेर काढून एक गोळी हवेत झाडली. हि माहिती कळताच तुर्भे पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेतली.  व आरोपीला ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपीने घडलेली सर्व हकीकत सांगून पैसे उसने घेतल्याचा पुरावाही सादर केला. पोलिसांनी त्याला नोटीस देऊन सोडून दिले. या प्रकरणी ५० हजार रुपये किमतीचे विदेशी बनावटीचे पिस्टल. ७. एम एम चे १५ जीवंत काडतूस, झाडलेल्या गोळीची पितळी पुंगळी, आणि आरोपीचा शस्त्र  परवाना जप्त केला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The incident of firing in the air took place in turbhe midc area amy
Show comments