नवी मुंबई शहरात सिडकोनिर्मित हजारो कुटुंबांचा जीव टांगणीला लागला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात सिडकोनिर्मिती घरात राहणाऱ्या लोकांची घरे ही अल्पावधीतच धोकादायक झाली आहेत. अशाच धोकादायक इमारतीतील घरांचे छत कोसळण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशाच सीवूडस सेक्टर ४८मधील प्रियदर्शनी सोसायटीत एका घरातील स्वयंपाक खोलीचे छत अचानक कोसळल्याची घटना घडली. मात्र, घरातील महिला काही सेकंदापूर्वीच स्वयंपाकखोलीतून बाहेर पडल्यामुळे तिचा जीव थोडक्यात वाचला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई विमानतळ परिसरातील सुरुंग स्फोटामुळे वहाळमधील घरांना तडे

Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rent free office space in Mhada Bhawan to developer in vangani
वांगणीतील विकासकावर ‘म्हाडा’ची कृपादृष्टी?
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
Garbage piles up in various places in the city due to the recruitment of election workers Mumbai news
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; निवडणूक कामातील कामगारांच्या नियुक्त्यांमुळे कचरा व्यवस्थापनाची घडी विस्कटली
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!

डी ३९/१/ या घरात सुरेश बुरुंगले व त्यांची पत्नी हे दोघे राहतात. रविवारी पहाटे ५ वाजता उठल्यानंतर दात घासण्यासाठी स्वयंपाक घरातून ब्रश घेऊन बाहेर पडताच स्वयंपाक घरातील छताच्या प्लास्टरचा मोठा भाग कोसळला त्यामुळे या महिलेचा जीव थोडक्यात बचावला. त्यांचे पती सुरेश बुरुंगले हे हॉलमध्ये बसले होते. नशीब बलवत्तर म्हणून या दोघांचा जीव वाचला. या सोसायटीसह सिडकोनिर्मित अनेक घरे धोकादायक झाली असून सीवूडस विभागासह सिडकोनिर्मित घरांचे छत कोसळण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

नवी मुंबई शहरातील धोकादायक इमारतींची संख्या वर्षानुवर्ष सातत्याने वाढत आहे. २०२२-२३ यावर्षातील नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे विभागवार सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ५१४ इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २६४ अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत.परंतू पालिका प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्याचे काम करते. तर दुसरीकडे सिडकोच्या निकृष्ट कामामुळेच शहरातील सिडकोनिर्मित घऱे ही अल्पावधीत धोकादायक झालेली आहेत.त्यामुळेच अशा प्रकारे छताचा भाग कोसळून जखमी झालेल्यांची संख्या खूप मोठी आहे.शहरात वारंवार विविध सिडकोनिर्मित सोसायट्यांमध्ये असे प्रकार घडत आहे. याबाबत स्थानिक माजी लोकप्रतिनिधी व भाजपाचे पदाधिकारी भरत जाधव यांनी तात्काळ भेट देऊन सहकार्य केले. वारंवार घडणाऱ्या या घटनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सिडकोच्या विरोधात संताप निर्माण झाला आहे.सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांनी विभागातील सर्वच इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन तात्काळ इमारतींची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा- पती, पत्नी आणि ‘तो’ प्रकरणात पतीची आत्महत्या

प्रियदर्शनी व आजूबाजूच्या इतर सोसायटीमध्ये घरांच्या छताचे प्लास्टर कोसळण्याच्या यापूर्वीही घटना घडल्या आहेत.त्यामुळे सिडकोने तात्काळ याबाबत निर्णय घेण्याची आवश्यकताआहे.सिडकोनिर्मित धोकादायक इमारतीत रहिवाशी जीव मुठीत घेऊन राहत आहेत.सिडकोने तात्काळ याबाबत कारवाई करण्याची मागणी भाजपचे माजी लोकप्रतिनिधी भरत जाधव यांनी केली आहे.

चौकट नेहमीप्रमाणे सकाळी पाच वाजता उठल्यानंतर मी हॉलमध्ये बसलो होतो तर माझी पत्नी किचनमध्ये होती ब्रश घेऊन ती किचन मधून बाहेर पडतात छताच्या प्लास्टरचा मोठा भाग कोसळला सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही परंतु आम्ही असे किती दिवस जीव मुठीत घेऊन या सिडको निर्मित घरांमध्ये राहायचे याबाबत सिडकोने तात्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असे मत प्रियदर्शनी सोसायटी सीवूड्सचे रहिवाशी सुरेश बुरुंगुले यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- नवी मुंबई: एपीएमसीस ट्रकला आग, सुदैवाने जीवित हानी नाही

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारती

अतिधोकादायक इमारती-६१
संरचनात्मक दुरुस्ती आवश्यक इमारती-१२०
इमारत रिकामी न करता दुरुस्त करता येणाऱ्या इमारती – २८२
किरकोळ दुरुस्ती करता येणाऱ्या इमारती-५१