महापालिकेकडून निवड झालेल्या १८३ जणांची यादी प्रसिद्ध
नवी मुंबई महापालिकेत शिक्षकांच्या तुटवड्यामुळे शिक्षणाचा सावळागोंधळ सुरु असल्याने पालिकेत तासिका तत्वावर १८३ शिक्षकांची भरती केली आहे. सोमवारी १० जुलै रोजी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात थेट मुलाखतीने सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती.
नवी मुंबई महापालिकेच्या विविध माध्यमाच्या शाळा आहेत. मराठी, सीबीएसई, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा असून पालिका तासिका तत्वावर शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यात प्राथमिक विभागासाठी १२३ तर माध्यमिक विभागासाठी ६० शिक्षकांची भरती निवड झाली आहे. प्राथमिक विभागासाठी घेण्यात आलेल्या १२३ शिक्षकांपैकी मराठी माध्यमासाठी ८८, हिंदी माध्यमासाठी ३१ तर उर्दू माध्यमासाठी ४ शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. तर माध्यमिक विभागासाठी ९ वी १० वी वर्गासाठी ६० शिक्षक घेतले मिळणार असून त्यात मराठी माध्यमासाठी ३७ ,हिंदी माध्यमासाठी ११, उर्दू माध्यमासाठी २ तर इंग्रजी माध्यमासाठी १० शिक्षकांची नेमणूक निवड केली आहे.
हेही वाचा >>>वाशीम : चक्क पंचायत समितीमध्येच भरली शाळा! शिक्षकांची पदे रिक्त, गोरगरीब विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
हेही वाचा >>>वर्धा : आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन होणार २४ तासांत जमा, मिळणार ‘इतके’ कोटी रुपये
माध्यमिक विभागासाठी तासिका तत्वावर झालेल्या भरतीसाठी प्रतिताशी १५० रुपयाप्रमाणे ६ तासाचे ९०० रुपयाप्रमाणे मानधन दिले जाणार असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे शिक्षक उपायुक्त दत्तात्रय घनवट यांनी दिली.
तासिकानुसार अंदाजे एवढे महिना मानधन…
प्राथमिक शिक्षक मानधन-१९५००रुपये
माध्यमिक शिक्षक
मानधन -२४५०० रुपये