नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात अतिशय शांततेत गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर सोमवारपासून सुरु होणाऱा नवरात्रौत्सव शांततेत व आनंदात साजरा करण्यासाठी पोलीसांनी चोख व्यवस्था केली आहे. करोनानंतर निर्बंधमुक्त वातावरणात होणाऱ्या नवरात्र उत्सवात दांडीया व गरबा राससाठी शासनाने निश्चित केल्याप्रमाणे रात्री १० वाजेपर्यंतची वेळ असून अष्टमी व नवमीला मात्र रात्री १२ वाजेपर्यंतची वेळ असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>उरणच्या ग्रामीण भागालाही कंटेनर वाहनांचा विळखा

नवी मुंबई शहरात मोठ्याप्रमाणात सुरवातीला नवरात्रीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात असे.परंतू न्यायालयाने रस्त्यावर नवरात्र उत्सव साजरा करण्यास घातलेल्या निर्बंधामुळे तसेच वेळेच्या बंधनामुळे शहरातील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या उत्सवालाही निर्बंध आले आहेत.नवी मुंबई शहरात गुजराती बांधवांच्यावतीने हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.नवरात्र उत्सवात आवाजावरील निर्बंध तसेच डीजेवरील आणलेले निर्बंध यामुळे या उत्सवाला मर्यादा आलेल्या आहेत.परंतू ज्या ज्या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जातो.त्याठिकाणी अनेक वेळा छेडछाडीचे प्रकार घडत असल्यामुळे साध्या वेषात या ठिकाणी पोलीसांचा वावर असणार आहे.तसेच हुल्लडबाजी करुन उतसवात गोंधळ घातल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांमार्फत देण्यात आली आहे.

शहरात गणेशोत्सव नागरीकांच्या सहकार्याने अतिशय शांततेत पार पडला असून नवरात्रीमध्येही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी चोख व्यवस्था केली आहे.तसेच दांडीयाच्या दरम्यान छेडछाडी व हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.तसेच सुरक्षेबाबत योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागामार्फत चोख व्यवस्था केली आहे.शासनाने दिलेल्या नियमानुसार वेळेचे बंधन असणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलीसांच्या विशेष शाखेने दिली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : सत्तेसाठी झालेली चूक आम्ही दुरुस्त केली!- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवरात्रीत महिलांचा नव रंगाचा साज….
नवरात्रीत महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असून प्रत्येक दिवशी एक रंग याप्रमाणे नवरंगांची उधळण नऊ दिवस पाहायला मिळणार असून गरबा व दांडीयाखेळाच्या दरम्यानही या दररोज निश्चित केलेल्या रंगाचा झलक कार्यालयांपासून ते देवीच्या दररोज परिधान करण्यात येणाऱ्या साडीपर्यंत पाहायला मिळणार आहे.

नवी मुंबई शहरात नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. नवी मुंबईतील बेलापूर येथील श्री गोवर्धनी माता मंदिरातही आमदार मंदा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.