पनवेल: १० वर्षांपासून पनवेलकरांची सांस्कृतिक भूक भागविणा-या पनवेल शहरातील आद्यक्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे अंतर्गत दुरुस्तीचे काम पनवेल पालिकेने हाती घेतले असून त्यासाठी ५५ लाख रुपये खर्च पालिका प्रशासन कऱणार आहे. हे काम करता यावे म्हणून नाट्यगृह व्यवस्थापनाने मार्च व एप्रिल महिना या दरम्यानच्या नाटक व कार्यक्रमांच्या आगाऊ बुकींग घेतलेल्या नाहीत. परंतू निवडणूक आयोगाकडून कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते यामुळे नेमके हे नाट्यगृह कधीपासून व कधीपर्यंत बंद राहील हे पालिकेने जाहीर केले नसल्याने पुढील ६० दिवस पनवेलकरांना नाटकाविना रहावे लागणार आहे. आद्यक्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहाची आसन क्षमता ६५० आहे. नाट्यगृहातील रंगमंचाच्या खालील लाकडी साचा निकळण्याच्या तक्रारी नाट्य कलावंतांकडून झाल्या होत्या. तसेच रंगमंचाजवळील पडद्याची व्यवस्था, विंग, विज व्यवस्थेच्या तक्रारी होत्या. काही खुर्च्या नादुरुस्त असून त्या बदलण्याची मागणी प्रेक्षकांकडून केली जात होती. कार्पेट बदलणे अशा इतर कामांसाठी ५५ लाख रूपयांचा खर्च पालिका प्रशासन करणार आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यातील ६० दिवस फडके नाट्यगृह कामासाठी बंद ठेवून ही कामे तातडीने करुन घ्यावीत असे पालिकेचे नियोजन असल्याची माहिती नाट्यगृहाचे व्यवस्थापक राजेश डोंगरे यांनी सांगीतले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा