नागरिकांकडून बरेचदा रोजच्या ओल्या व सुक्या कचऱ्यासोबत जुन्या वस्तूदेखील कचऱ्यामध्ये दिल्या जातात. यामधील अनेक वस्तू पुन्हा वापरात आण्याजोग्या असतात. अशा वस्तुंचा पुनर्वापर होण्यासाठी शहरात विविध विभागांमध्ये ठिकठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण स्टॅण्ड उभारून नको असेल ते द्या ,हवे असेल घ्या योजना मार्च मध्ये सुरू करण्यात आली होती. मात्र, ती संकल्पना आजमितीला बारगळी असून स्टँड आपलं अडगळीत पडलेले निदर्शनास येत आहे.
हेही वाचा- मोरा- मुंबई जलसेवा तीन तास बंद राहणार; बंदरातील गाळामुळे प्रवाशांचा खोळंबा
‘थ्री आर’ संकल्पनेअंतर्गत अर्थात कचरा निर्मितीत घट , टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर व कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया या अनुषंगाने शहरात विविध विभागांमध्ये ठिकठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण स्टॅण्ड उभे करण्यात आलेले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्राथमिक स्वरूपात बेलापूर ते दिघा या विभागात ३५ ठिकाणी हे स्टँड ठेवण्यात आले होते. त्यांनतर टप्प्याटप्प्याने सर्वच प्रभागांमध्ये ठेवण्यात येणार होते. या स्टँडमध्ये विविध प्रकारच्या वस्तू ठेवण्यासाठी विशिष्ट कप्पे तयार करण्यात आलेले असून नागरिकांनी त्यांच्या वापरात नसलेले मात्र वापर केला जाऊ शकतो असे चांगल्या प्रकारचे रोजच्या वापरातील कपडे, चपला व बूट, भांडी, खेळणी, चादर, ब्लॅंकेट अशा प्रकारच्या विविध वस्तू या स्टँण्डमध्ये आणून ठेवायच्या , त्या वस्तू गरजूंना वापरासाठी उपयोगात येऊ शकतात या हेतूने नको असेल ते द्या हवे असेल ते घ्या ही संकल्पना राबविण्यात येत होती.
हेही वाचा- २९ कोटींचे खाद्यपदार्थ जप्त; अन्न व औषध प्रशासनाची नवी मुंबईत कारवाई
सुरुवातीला या नावीन्यपूर्ण संकल्पना प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे नको असलेल्या वस्तू मात्र गरजूंसाठी आवश्यक असलेल्या वस्तू पोहोचत होत्या . परंतु आता हे स्टॅन्ड वापराविना बिनकामी स्टॅन्ड ठरत आहे. काही ठिकाणी स्टँड गंजले आहे. काही ठिकाणी स्टँडमध्ये कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे .