पनवेल: दिवा पनवेल रेल्वेरुळाखाली गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सूमारास एकजण आत्महत्या करत असताना पोलीसांनी वेळीच पोहचून त्याचे प्राण वाचवले. या घटनेनंतर तळोजा वाहतूक शाखेत काम करणाऱ्या त्या कर्मचा-यांचे कौतुक होत आहे.गुरुवारी सायंकाळी सहा वाजता दिवा पनवेल रेल्वेरुळालगत पेणधर रेल्वेफाटक येथे वाहतुक कोंडी झाल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूनील कदम यांनी पोलीस हवालदार आदिनाथ आघाव व पोलीस शिपाई अनिल खैरे या पोलीस कर्मचा-यांची नेमणूक फाटक परिसरात केली होती. पोलीस वाहतूक नियमनाचे काम करीत असताना रेल्वे फाटकचे गेटमन यांनी पोलीसांना मदतीसाठी हाक मारली. रेल्वे फाटकापासून ५० मीटर अंतरावर एक तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे गेटमनने पोलीसांना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दरम्यान फाटकापासून काही अंतरावर दोन रेल्वे रुळांवरुन धावत होत्या. काही मिनीटात या रेल्वे पेणधर फाटकातून क्रोस होणार होत्या. मात्र पोलीस शिपाई खैरे यांनी दोन्ही रेल्वे रुळांवरून रेल्वे क्रॉसिंग होण्यापूर्वी स्वतःचा जीव धोक्यात घालून पीडीत तरुणाच्या दिशेने धाव घेतली. पोलीस खैरे यांनी तरुणाला रुळापासून वेगळे करुन त्याचे प्राण वाचवले. पोलीसांनी या तरुणाकडे माहिती घेतल्यावर तो २८ वर्षांचा असून तो तळोजा वसाहतीमध्ये फेस २ मध्ये राहणारा असल्याचे पोलीसांना समजले. तसेच हा तरुण विवाहित असून त्याचे आणि त्याच्या पत्नीचे भांडण झाल्याने पत्नीने तिचा फोन बंद करून घरसोडून निघून गेल्याने त्याने नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचे पोलीसांना सांगीतले. त्यानंतर पोलीसांनी तरुणाची समजूत काढली. या घटनेदरम्यान रेल्वेरुळावर फाटक उघडण्याची प्रतिक्षा करणा-या वाहनचालक व प्रवाशांनी पोलीसांचे हे सर्व कर्तव्यदक्षता पाहून त्यांच्या कामाचे कौतुक केले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The police saved the life of a young man who committed suicide under the railway track amy
Show comments