पनवेल : खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ येथील रस्ता खचला. मंगळवारी खचलेल्या रस्त्यात पाण्याच्या टॅंकरचे चाक अडकल्याने टॅंकरचालकाने मोठी कसरत करून रुतलेला टॅंकर काढला. परंतु तोपर्यंत त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला होता.
खारघर वसाहतीमधील रस्त्याकडेला अनेक ठिकाणी महानगर गॅस वाहिनी भूमिगत करण्याचे काम करण्यात आले. परंतु ज्या ठिकाणी गॅसवाहिनीचे काम झाले आणि त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण झाले, त्या ठिकाणी मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ इ भूखंड क्रमांक ४७ व ४८ च्या समोरील रस्त्यावर रस्ता खचला.
हेही वाचा – मॅनहोल मध्ये पडून सहा जण जखमी, अर्धवट कामाचा फटका; शिवसेनेचे ठिय्या आंदोलन
कॉंग्रेस जिल्हा कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. सचिन पवार यांनी याबाबत पनवेल पालिकेकडे संपर्क साधून संबंधित खचलेला रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.