नवी मुंबई : धावत्या लोकल वर दगड बाटल्या फेकून मारण्याचा प्रकार जवळपास बंद झाला होता. मात्र नवी मुंबई भागात काही दिवसापूर्वी असाच प्रकार घडला यात तीन महिला व एक लहान मुलगा जखमी झाले होते. या प्रकरणी बाटली फेकून मारण्याचा शोध वाशी रेल्वे पोलीस घेत आहेत.काही वर्षापूर्वी विघ्नसंतोषी वृत्तीचे लोक धावत्या लोकलवर दगड बाटल्या, अंडी टमाटे फेकून मारत होते. हा प्रकार एवढा वाढला कि नंतरच्या काळात लोकलच्या खिडक्यांना लोखंडी जाळी बसवणे सुरु झाले. तसेच ज्या भागात असे प्रकार होतात त्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त सुरु केली. त्यात अनेक जण पकडलेली गेले व हा प्रकार पूर्णपणे थांबला.
मात्र सहा तारखेला जुईनगर ते नेरूळ दरम्यान एका अद्यात व्यक्तीने रिकामी बाटली लोकलच्या महिला बोगीच्या दिशेने भिरकावली. हि बाटली लोकलमध्ये कशाला तरी धडकली आणि फुटली. फुटलेल्या बाटलीच्या काढा लागून चार जण जखमी झाले. गुरवारी सकाळी १०.५० च्या दरम्यान जुईनगर नेरूळ दरम्यान हा प्रकार घडला. यात मुंबईत राहणाऱ्या सोनल सावंत यांच्या सह दोन महिला जखमी झाल्या आहेत तसेच एका लहान मुलालाही काच लागली. या प्रकरणी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद आढाव तपासाधिकारी म्हणून काम पाहत आहेत.