नवी मुंबई: एपीएमसी बाजारात वर्षभर परदेशी सफरचंद बाजारात दाखल होत असतात. जुलैअखेर देशी सफरचंद दाखल होण्यास सुरुवात होते. शिमला, हिमाचल प्रदेश मधील सफरचंद दाखल होतात, मात्र यंदा तापमान वाढ आणि अवकाळी पावसाचा फटका बसल्याने अवघे ४०% उत्पादन आहे. त्यात आणखी ऑगस्टमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने उत्पादनावर पाणी फेरले आहे. परदेशी हंगाम ही तुरळक आहे, त्यामुळे यंदा देशी सफरचंदचा हंगाम महागाईचा राहणार आहे.

एपीएमसीत वर्षभर परदेशी सफरचंद दाखल होत असते. मात्र जुलै ते सप्टेंबर दरम्यान देशी सफरचंदचा हंगाम सुरू असतो. यंदा तापमान वाढीमुळे तसेच जन्मू आणि काश्मीर तसेच हिमाचल प्रदेशात पडणाऱ्या अवकाळी पावसाने देशी सफरचंदाच्या हंगामाला उशिराने सुरुवात झाली शिवाय उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे यंदा अवघे ४०% उत्पादन आहे. तसेच सध्या परदेशी सफरचंद हंगाम ही संपुष्टात आला आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या सफरचंदला मागणी असून पुरवठा कमी आहे. त्यामुळे यंदा देशी सफरचंदचे दर ही चढेच राहितील, अशी माहिती घाऊक व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली आहे.

Maharashtra grape cultivation
पाच वर्षांत पन्नास हजार एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट, उत्पादन खर्च वाढल्याने अन्य पिकांकडे कल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Grape
राज्यात ५० हजार एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड ? जाणून घ्या, नोटबंदी, कोरोना टाळेबंदी, नैसर्गिक आपत्तींचा परिणाम
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
Target of purchasing 33 lakh quintals of paddy in tribal areas
आदिवासी क्षेत्रात ३३ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट

हेही वाचा… नवी मुंबई : आयसीएससीई इंग्रजी शाळेत ना.धों. महानोर यांच्या कवितांचा काव्यारंग रंगला

सध्या एपीएमसी बाजारात १०-१२ गाड्या दाखल होत आहेत. तेच मागील वर्षी ऑगस्टमध्ये २०-२५ गाड्या आवक होती. त्यामुळे घाऊक बाजारात २५-३० किलोला ३ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी विक्री होत असून तेच मागील वर्षी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांनो विक्री होती. किरकोळ बाजारातही मागील वर्षीच्या तुलनेत ५०-१०० रुपयांनी महागले आहेत. मागील वर्षी किरकोळीत देशी सफरचंद प्रतिकिलो १००-१५० रुपयांनी विक्री होत होते, परंतु यंदा उत्पादन कमी असल्याने २००-२५० रुपयांनी विक्री होत आहे. त्यामुळे यंदा देशी सफरचंदचा महागाईचा हंगाम राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Story img Loader