वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असून विना हेल्मेटचा विशेष ड्राईव्ह घेण्यात आला. त्यात एकाच दिवसात एक हजार चारशे सत्तावीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : बेकायदा बांधकामाबाबत पालिका अतिक्रमण विभागाचा एमआरटीपी नोटीसींचा फार्स
नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी मिलिंद भारंबे यांची नियुक्ती झाल्यापासून प्रत्येक विभागात कारवाईचा धडाका सुरु असून वाहतूक व्यवस्था शिस्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षापासून बिघडलेली वाहतूक व्यवस्थेची घडी बसविण्यासाठी प्रयत्न केले गेले. सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचणारा रस्ते सुरक्षा साप्ताह नुकताच पार पडला. मात्र, यात कारवाई ऐवजी गांधीगिरी, समुपदेशन आणि उपाययोजना तसेच जनजागृतीवर भर देण्यात आला. त्यानंतर आता वाहतूक विभाग अँक्शन मोडमध्ये आला आहे.
वाहनचालकांना वाहतूक शिस्त लागावी जेणेकरून अपघाती मृत्यूत घट होऊ शकेल या विचाराने पहिल्याच दिवशी विना हेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या या विशेष ड्राईव्हमध्ये एकाच दिवसात एक हजार चारशे सत्तावीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात सर्वात आघाडीवर राहिले ते पनवेल तर कारवाईत सर्वात कमी तुर्भे आणि उरणमध्ये विना हेल्मेट आढळून आले आहे. पनवेल मध्ये सर्वाधिक १८४ तर उरण आणि तुर्भे मध्ये प्रत्येकी १६ कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली.
युनिटचे नाव/विना हेल्मेट/
वाशी/१४५
एपीएमसी/६६
कोपरखैरणे/८१
रबाळे/१२७
महापे/१९२
तुर्भे/१६
सिवुड्स/३९
सीबीडी/६९
खारघर/७२
तळोजा/१२२
कळंबोली/ १०१
पनवेल / १८४
नवीन पनवेल /१८
उरण/ १६
न्हावाशेवा /१०९
गव्हाणफाटा / ७०
एकुण/ १,४२७