नागरिकांना सर्वोत्तम शहरात राहतोय याचा आनंद देण्यासाठी शहर सुशोभिकरणावर भर देण्यात येणार आहे. विशेषतः शहरातील रेल्वे स्थानक, शिव-पनवेल महामार्गाच्या स्वच्छता आणि सुशोभिकरणावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. नुकतेच महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत आयुक्तांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा- शीव-पनवेल महामार्गावरील पथदिवे बंद; केबल खराब झाल्याने अंधार

नवी मुंबई शहर स्वच्छतेवर बारकाईने लक्ष देतानाच सुशोभिकरणावरही व्यापक स्वरुपात भर दिला तर नागरिकांना आपण सर्वोत्तम शहरात राहतो याचा आनंद वाटतो आणि हेच शहर सुशोभिकरणामागील मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी “स्वच्छ सर्वेक्षण २०२३” मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाटचालीची दिशा स्पष्ट केली. शहर स्वच्छता व सुशोभिकरणातील कमकुवत बाजू असलेल्या रेल्वे स्थनाक आणि शिव पनवेल महामार्गावर महानगरपालिकेच्या अखत्यारित नसलेल्या २ बाबींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा- भारतीय संस्कृतीच्या प्रेमापायी भारतीय तरुणाशी केला विवाह; मात्र, नशिबी सासूरवास, अखेर…

यादृष्टीने रेल्वे स्थनाक यासाठी सिडको तसेच शिव पनवेल मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधून शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने सहकार्य घेऊन त्याठिकाणी स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. उद्याने व मोकळ्या जागांच्या सुशोभिकरणासाठी विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांचे छायाचित्रांसह सादरीकरण करण्यात आले व यामध्ये आपली कल्पनाशक्ती मिसळून नवी मुंबई शहर अधिक सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करा. आत्तापासूनच सुशोभीकरणाला सुरुवात करून २५ डिसेंबरपर्यंत सुभोभिकरणाची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Story img Loader