पौर्णिमेची भरती असून देखील उरण येथील पाणजे पाणथळ क्षेत्र समुद्राचे पाणी रोखल्याने २८९- हेक्टर अंतर्गत भरती पाणथळ क्षेत्र कोरडे झाले आहेत. त्यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांच्या उड्डाणावर निर्बंध येत आले आहेत. याचा पक्षी अभ्यासावर परिणाम होत असल्याचे पर्यावरणवाद्याचे मत आहे. अरबी समुद्राचा अंतर्गत भरती जलप्रवाह खंडीत केल्याचा हा परिणाम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हवाई सुरक्षेच्या दृष्टिकोनाने केल्या जाणा-या स्थलांतरीत पक्ष्यांच्या उड्डाण अभ्यासावर विपरीत परिणाम होणे सुरु असल्याचे नॅटकनेक्ट फाउंडेशनने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा- असा असेल सायन- पनवेल महामार्गावरील वाशी गावाजवळील नवा टोलनाका’
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची (एनएमआयए)ची जरी वेगाने प्रगती होत असली तरी, विमानांच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण असलेले पक्ष्यांच्या उड्डाणाच्या पध्दतीवरचे संशोधन स्थगित करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान नियंत्रण (एमओइएफसीसी) मंत्रालयाने हस्तक्षेप करुन देखील राज्य शासनाने कोणतीही कृती केलेली नाही, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार यांचे म्हणणे आहे. नॅटकनेक्टने केलेल्या तक्रारीची दखल घेत एमओइएफसीसीने राज्य पर्यावरण विभागाला घेतलेल्या कृतीवरचा अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले होते. या अहवालाची अजूनही प्रतिक्षा आहे.
बीएनएचएसचे संचालक डॉ. बिवश पांडव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या बीएनएचएस टीमला एका वर्षापूर्वी पक्षांचा अभ्यास करण्यासाठी पाणजे पाणथळ क्षेत्रात प्रवेशाची परवानगी नाकारली होती. आणि तेव्हापासून संशोधकांनी हा अभ्यास बंद केला आहे. परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
हेही वाचा- १४ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उरणकरासाठी आशेचा किरण; उरणच्या उपजिल्हा रुग्णालय भूखंडाची पाहणी
दरम्यान उच्च भरती काळ असून देखील पाणथळ क्षेत्राचा मोठा भाग कोरडा होऊ लागला आहे. पाणी अडविणे ही पर्यावरण संचालक नरेंद्र टोके यांनी रायगड जिल्हा जिल्हाधिका-यांना, नवी मुंबई सेझ आणि सिडकोला दिलेल्या आदेशाचे उल्लंघन आहे. हे सीआरझेडआय-१ क्षेत्र असल्यामुळे जलप्रवाहाला धक्का न पोहोचण्याची खात्री करण्याचे टोके यांनी संबंधित संस्थांना निर्देश दिले होते, या मुद्द्याला कुमार यांनी दिनांक ११ नोव्हेंबर २०२० रोजीच्या आदेशाला नमूद करत ठळक केले आहे. ते महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एमसीझेडएमए) सभासद सचिव देखील आहेत. दुर्दैवाने एमसीझेडएमएकडे स्वत:चेच आदेश लागू करण्याची यंत्रणा नाही आणि संस्था जिल्हा व्यवस्थापनावर जास्त प्रमाणात अवलंबित आहे असे कुमार यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी क्षेत्रात प्रभारी असायला हव्या असलेल्या उप-विभागीय अधिका-यांकडेच तक्रार केली होती.
हेही वाचा- नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायाला आणि विकासाला चालना देण्यासाठी समिती
जैवविविधतेवर वारंवार होणा-या आक्रमणांकडे त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पाण्याने भरलेले पांणजे पाणथळ मासे आणि खेकड्यांचा उत्तम स्त्रोत आहे. सोबत येथे स्थानिक व स्थलांतरीत पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आढळतात. नुकतेच सिडकोने मुंबई उच्च न्यायालयाना प्रस्तुत केलेल्या दस्तऐवजात हे कबूल केले आहे, की पाणजे मासेमारी क्षेत्र आहे. पाणथळ क्षेत्र शुष्क झाल्यामुळे साहजिकच पक्ष्यांना लहान मासे आणि शेवाळ मिळेनासे होणार आहे. बीएनएचएस, कांदळवन सेल आणि पर्यावरणवादी पांजेला वाचवण्यासाठी निकराचे प्रयत्न करत आहेत. उरणच्या संवेदनशील इकोलॉजीला राखण्यासाठी या संपदेचे जतन करणे आवश्यक आहे.