नवी मुंबई : बेलापूर येथे मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी  मंगळवारी संध्याकाळी पाणीपुरवठा बंद  होता तर  आज सकाळी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. परंतु बुधवारी अजीवली येथे मोरबे धरणावरून येणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे  आज शहरात संध्याकाळी पाणीपुरवठा बंद राहणार असून गुरुवारी सकाळी ही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे त्यामुळे नवी मुंबई शहरात सलग दोन दिवस नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. बेलापूर येथील जलवाहिनी दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला होता. परंतु आजही सकाळी अजिवली गावाजवळ  नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे  नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The water supply pipe to navi mumbai burst near ajivali village ysh
Show comments