नवी मुंबई : विद्युत खांबवर चढून काम करताना अचानक वायरला स्पर्श झाल्याने झालेल्या अपघातात एका कामगाराचे दोन हात गेले. या खांबावरील विद्युत प्रवाह बंद करण्याऐवजी तिसऱ्याच ठिकाणाचा विद्युत प्रवाह बंद केल्याने ही घटना घडली. मात्र या हलगर्जीपणाने  एका युवा कामगाराला दोन्ही हाताला मुकावे लागले. यातील आरोपींविरोधात चार महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिद्धार्थ डोंगरे, अर्जुन चव्हाण, ऑल ग्लोबल कंपनीचे संचालक या आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील फिर्यादी सलमान भिवंकर हे वायरमन म्हणून कंत्राटी पद्धतीने महावितरणमध्ये काम करतात. २८ जूनला पावणे कार्यक्षेत्रात रामनाथ सोलार गल्लीत विद्युत पुरवठ्यात काही बिघाड झाला होता. त्याच्या दुरुस्तीसाठी विद्युत खंबावर चढणे आवश्यक होते. हे करण्यापूर्वी सदर विद्युत खांबावरील वायरमध्ये ज्या ठिकाणाहून विद्युत पुरवठा होतो, ती कळ अगोदर बंद करणे आवश्यक होते. ते करण्यासाठी अर्जुन चव्हाण हे गेले मात्र त्यांनी या विद्युत खांबावर ए ७१२ क्रमांकाचे बटन (आर एम आय) बंद करण्याऐवजी ए ७१५ क्रमांकाचे बटन बंद करून विद्युत प्रवाह बंद केला. 

Youth robbed in front of Sassoon Hospital entrance Pune news
पुणे: ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर तरुणाची लूट
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Accused of vandalizing vehicles in Kasba Peth arrested Pune news
कसबा पेठेत वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची धिड
pune koyta attack news
पुणे : बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरुद्ध आणखी एक गु्न्हा, तरुणावर कोयत्याने वार
CBD sixth year old boy killed road accident collision with dumper
सीबीडी येथे डंपरने दिलेल्या धडकेत सहावीचा चिमुरडा ठार, चालक फरार
kawad village bhiwandi wada road theft attempt failed
बंगल्यात चोरी करण्यासाठी चोरट्यांची टोळी जीपगाडीने आली पण मार खाऊन गेले
four arrested including ex corporator swapnil Bandekar in Rs 10 crore extortion case
बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली १० कोटींची खंडणी; माजी नगरसवेक स्वप्निल बांदेकरसह चौघांना अटक
pune two wheeler theft marathi news
पुणे :सिंहगड रस्ता भागात दुचाकी चोरट्यांना पकडले, पाच दुचाकींसह लॅपटॉप जप्त

हेही वाचा – मालमत्ता सर्वेक्षणाचा देखावा? नवी मुंबईत अवघ्या दहा हजार मालमत्ता वाढल्या; गावठाण, वसाहतींमध्ये सर्वेक्षण नावालाच

हेही वाचा – सिंगापूरमध्ये नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या दोघांना मध्यप्रदेशातून अटक, दोघांचा शोध…

ही चूक सलमान यांना प्रचंड महागात पडली. अर्जुन याने विद्युत पुरवठा बंद केला या गैरसमाजातून खांबा वर चढून बिनधास्त विद्युत बिघाड दुरुस्त करताना वायरला हात लावला. मात्र त्यातील विद्युत प्रवाह बंद झाला नसल्याने सलमान यांचा हात लागताच स्फोट झाला व ते फेकले गेले व खांबावरून थेट खाली पडले. यात दोन्ही हात दोन्ही पाय आणि डोक्याच्या मागे त्यांना जबर मार लागला. उपचारादरम्यान त्यांचे दोन्ही हात कापावे लागले. यासाठी सेक्शन इंजिनिअर सिद्धार्थ डोंगरे व वायरमन अर्जुन चव्हाण तसेच ऑल इंडिया ग्लोबल कंपनी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. यात संबंधित कंत्राट घेतलेल्या ग्लोबल कंपनीने कुठलीही सुरक्षा साधने पुरवली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

Story img Loader