लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पनवेल : पनवेल शहरातील शीव पनवेल महामार्गालगत पनवेल इंडस्ट्रीयल कॉ.ऑप. इस्टेटमधील हॉलमार्क मोटार कंपनीच्या शोरुममध्ये बुधवारी पहाटे पावणेदोन लाख रुपयांची चोरी झाली आहे. चोरट्याने शोरुममध्ये शिरुन लॅपटॉप, मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरी केली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

आणखी वाचा-शेअर ट्रेडींगमध्ये अधिकचा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेबावीस लाखांची फसवणूक

हॉलमार्क कंपनीचे पनवेलमधील शोरुममध्ये रॉयल इनफील्ड कंपनीच्या दुचाकी विक्री केली जाते. मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटेपर्यंत शोरुमच्या मागील बाजूकडून जीन्याचे प्रवेशव्दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी शोरुममध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी रोख रकमेसह दोन मोबाईल फोन आणि शोरुमच्या मागील बाजूस दुचाकीचे दुरुस्तीचे काम करण्याच्या ठिकाणाहून रोकड लंपास केली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theft of rs 2 lakh from a showroom in panvel mrj