खोपटे ते चिरनेर मार्गावरील मोठीजुई कळंबुसरे – चिरनेर बाह्यवळण रस्त्यावर संपूर्ण वाहन अडकून पडेल इतके मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यातून मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत असल्याने या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी मनसे ने सार्वजनिक बांधकाम विभागा कडे केली आहे.
हेही वाचा >>>नवी मुंबई : शासकीय कार्यक्रमाचा फलक पडून अनेक गाड्यांचे नुकसान
उरण तालुक्यातील पूर्व व पश्चिम विभागाला जोडणाऱ्या खोपटा पुल – कोप्रोली ते चिरनेर या मार्गावरील कळंबुसरे गावातून जाणाऱ्या मार्गाला पर्याय म्हणून मोठीजुई ते चिरनेर हा बाह्यवळण मार्ग दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आला आहे. या मार्गावर तो कच्चा रस्ता असल्याने खड्डेच खड्डे पडले आहेत.
त्यामुळे कळंबुसरे गावाजवळील बायपास रस्त्याची तर सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून हा रस्ता खड्ड्यात हरवला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबईतील उच्च विद्युत वाहिन्याखालील नर्सरीच्या आडून बेकायदा कारभाराचे चांगभले
उरण तालुक्यातील खोपटा पुल – कळंबुसरे – चिरनेर या बायपास रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कळंबुसरे हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी दहा वर्षापूर्वी ताब्यात घेतल्या आहेत.परंतु शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला आजतागायत कळंबुसरे गावातील शेतकऱ्यांना देऊ केलेला नाही.तरी सार्वजनिक बांधकाम विभाग उरण येथील उप अभियंता नरेश पवार यांनी कळंबुसरे गावातील शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी व खड्डे युक्त रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा न पेक्षा मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन उभारतील असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी दिला आहे.या संदर्भात उरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नरेश पवार याच्याशी संपर्क साधला असता या रस्त्यासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याचा प्रस्ताव आमच्या कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करता येईल अशी माहिती त्यांनी दिली