अनंत चतुर्दशी निमित्ताने आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला बाजार सुरू ठेवण्यात आलेला होता,मात्र बाजारात ग्राहक नसल्याने ६०% ते ७०% शेतमालाला उठाव नाही. त्यामुळे भाज्यांचे दर १०रुपये ते २० रुपयांनी गडगडले आहेत.आज अनंत चतुर्दशी निमित्ताने कांदा बटाटा, फळ, धान्य आणि मसाला हे चार बाजार पूर्णतः बंद ठेवण्यात आलेले आहेत. परंतु एपीएमसी भाजीपाला बाजार हा पहाटे २ पासून सुरू होतो तर सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत बहुतांश शेतमाल विक्री होतो. तसेच भाजीपाला हा जीवनावश्यक असल्याने सुरू ठेवण्यात आलेला होता. मात्र नित्याची भाजीपाला बाजारात असणारी वर्दळ, खरेदी- विक्री , आज बाजारात ग्राहक फिरकले नसल्याने मंदावली होती. त्यामुळे बाजारात काल आणि आजच्या बऱ्याच भाज्या शिल्लक राहिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारच्या शिल्लक ताज्या भाज्या भेंडी, शिमला मिरची, काकडी आशा अनेक भाज्या उठाव नसल्याने फेकून देण्याची नामुष्की व्यापाऱ्यांवर ओढवली आहे. शुक्रवारी बाजारात ३८७ गाड्या शेतमाल दाखल झाला आहे. परंतु बाजारात ग्राहकच रोडावल्याने ६०% ते ७०% शेतमाल पडून आहे. अनंत चतुर्दशी निमित्ताने मुंबई सह उपनगरात मोठं मोठया विसर्जन मिरवणूका आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते वाहतूक वळविण्यात आलेली आहे. बहुतांशी किरकोळ ग्राहकांनी त्यांचा भाजी विक्री व्यवसाय बंद ठेवल्याचे चित्र आहे. त्यामुळे एपीएमसी घाऊक बाजारात पहाटे पासूनच ग्राहक भाजीपाला खरेदीसाठी दाखल झाले नाहीत. परिणामी बाजारात भाजीपाल्याची मोठी आवक असूनही उठाव नसल्याने भाजीपाल्याचे दर १०-२० रुपयांनी घरसले आहेत. काकडी, शिमला मिरची आणि वांगी हे घाऊक बाजारात प्रतिकिलो १०रुपयांवर उतरले आहेत.

एपीएमसी बाजारात गणेशोत्सव निमित्ताने भाजीपाल्याला उठाव कमी आहे. मात्र अनंत चतुर्दशी निमित्ताने बाजारात गुरुवारचा भाजीपाला बाजारात शिल्लक आहेच शिवाय आज शुक्रवारी दाखल झालेल्या शेतमालाला ही ग्राहक नसल्याने उठाव नाही. त्यामुळे बाजारात कालच शिल्लक राहिलेल्या भाज्या फेकून दिल्या आहेत.तर आज ही शेतमालाला उठाव नसल्याने दर घसरले आहेत. – बापू शेवाळे, घाऊक व्यापारी, एपीएमसी